कोथिंबीर वडी - पाककृती

कोथिंबीर वडी, पाककला - [Kothimbir Wadi, Recipe] कुरकुरीत, खमंग आणि चटपटीत कोथिंबीर वड्यांची पाककृती.
कोथिंबीर वडी - पाककला | Kothimbir Wadi - Recipe

कुरकुरीत, खमंग आणि चटपटीत 'कोथिंबीर वड्या’

‘कोथिंबीर वडी’साठी लागणारा जिन्नस

 • १ जुडी कोथिंबीर
 • १ १/२ बेसन (चणा डाळीचे पीठ)
 • २ मोठे चमचे कॉर्न फ्लॉवर
 • २ मोठे चमचे आलं लसूण पेस्ट
 • १ चमचा तिखट (किंवा चवीनुसार)
 • १/४ चमचा हळद
 • १ चमचा ओवा
 • २ चमचे धने जिरे पूड
 • चवीनुसार मीठ
 • पाणी
 • तेल

‘कोथिंबीर वडी’ची पाककृती

 • कोथिंबीर स्वच्छ धुऊन निवडून बारीक चिरून घ्यावी.
 • एक भांडे घेऊन त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन (डाळीचे पीठ), कॉर्न फ्लॉवर, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, ओवा, धने जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालावे.
 • सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
 • थोडे थोडे पाणी ओतत कोथींबीर मिश्रणाचा गोळा बनवावा.
 • तयार पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यावे आणि त्या गोळ्यांच्या लांबड्या सुरळ्या बनवून घ्याव्या.
 • कोथिंबीर मिश्रणाच्या सुरळ्या तेल लावलेल्या भांड्यात ठेवून वाफवून घ्याव्या (वाफविण्यासाठी कुकर, मल्टी कढई, इडली पात्र वापरू शकता).
 • १५ मिनिटे वाफवून घ्या (कुकरमध्ये वाफवणार असाल तर कुकरला शिट्टी लावू नका).
 • शिजलेल्या सुरळ्यांच्या मध्यम आकाराच्या वड्या कापून घ्या (वड्या कापण्यापूर्वी सुरळ्या थंड होऊद्या).
 • फ्राय पॅनवरती थोडेसे तेल पसरवून दोन्हीही बाजूने वड्या खरपुस भाजून घ्या.

तयार आहेत कुरकुरीत, खमंग आणि चटपटीत 'कोथिंबीर वड्या'.

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली / पाककला


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.