का रे अबोला केला तू माझ्याशी मज न कळले काही
का रे अबोलाकेला तू माझ्याशी
मज न कळले काही
तुझ्या वाचुनी
दिवस हा माझा
सरत नाही
तुझ्याशी बोलण्या
वाचूनी मलाही
करमत नाही
का रे दुरावा
असा तू केला
मला न कळले काही
रागावूनी तू
बोल काहीही
मी ऐकून घेईन
परि अबोला
धरू नको रे
तू बोल माझ्याशी काही
रुसूनी बसला
माझ्यावरी तू
मला न कळले काही