संसार - मराठी कविता

संसार, मराठी कविता - [Sansar, Marathi Kavita] संसार म्हणजे एक घर असतं, नवरा आणि बायको त्यांचं अस्तित्व.

संसार म्हणजे एक घर असतं, नवरा आणि बायको त्यांचं अस्तित्व

संसार म्हणजे एक घर असतं
नवरा आणि बायको त्यांचं अस्तित्व

नवरा म्हणजे छप्पर असतं
बायको म्हणजे भिंत असते

भिंत कोसळली की छप्पर पडतं
आणि छप्पर उडालं तर घर उघडं दिसतं

दोघांमुळेच घरात घरपण असतं
हेच मात्र खरं असतं

संसार म्हणजे एक घर असतं

छप्पर जेव्हा उन खातं
तेव्हा ते कुटूंबाला सावली देतं

आणि स्थिर राहते ती भिंत
तेव्हा ते घर, घर दिसतं

भिंतीवरच असते सगळी भिस्त
तरीही कुटूंब चूक ठोकत असतं

हेच मात्र खरं असतं
संसार म्हणजे एक घर असतं

यशवंत दंडगव्हाळ | Yashwant Dandgawhal
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.