Loading ...

अलंग किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

अलंग किल्ला - नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील ४५०० फूट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील अलंग किल्ला [Alang Fort].

अलंग किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

अलंग किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याच्या ११ टाक्या आहेत...


अलंग किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले)

(Alang Fort) हा ४५०० फूट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळसूबाई डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत अवघड समजला जातो. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विभागातील सर्वात कठिण अशा किल्ल्यांची ही भटकंती. घोटीवरून भंडारदऱ्याला जातांना कळसूबाई शिखराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हे दुर्गत्रिकुट तसे उपेक्षितच आहे.



अलंग किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. किल्ल्यावर राहण्यासाठी दोन गुहा आहेत. पाण्याच्या ११ टाक्या आहेत. किल्ल्यावर इमारतीचे काही अवशेष आहेत. एक छोटेसे मंदिर आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा खूप मोठा परिसर दिसतो. पूर्वेला कळसूबाई, औंधचा किल्ला, पट्टा, बितनगड, उत्तरेला हरिहर, त्र्यंबकगड, अंजनेरी तर दक्षिणेला हरिश्चंद्रगड, आजोबाचा गड, खुट्टा सुळका, रतनगड, कात्राबाईचा डोंगर हा परिसर दिसतो. किल्ल्याचा माथा फिरण्यास ४ तास पुरतात.

[next]

अलंग गडावर जाण्याच्या वाटा


आंबेवाडी मार्गे: अलंग किल्ल्यावर जाण्यासाठी इगतपुरी कसारा गाठावे. इगतपुरी-कसारा-घोटी-पिंपळनेरमोर या मार्गे आंबेवाडी गाठावी. घोटी ते आंबेवाडी अशी एस.टी. सेवा देखील उपलब्ध आहे. घोटी ते आंबेवाडी हे साधारण ३२ कि.मी. चे अंतर आहे. घोटीवरून पहाटे आंबेवाडीला ६ वाजताची बस आहे. आंबेवाडीतून समोरच अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले दिसतात. गावातूनच अलंग आणि मदनच्या खिंडी पर्यंत जाण्यासाठी वाट आहे. वाट फारच दमछाक करणारी आहे. खिंड गाठण्यास ३ तास लागतात. खिंडीत पोहचल्यावर डावीकडचा अलंग किल्ला तर उजवीकडचा मदन किल्ला. येथून अलंगवर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट खिंडीतून समोरच्या दिशेने खाली उतरते.

१ तासात आपण खालच्या पठारावर पोहचतो. येथून अलंगचा कडा डावीकडे ठेवत १ तासात आपण किल्ल्यावरून येणाऱ्या तीसऱ्या घळीपाशी पोहचतो. या घळतीच एक लाकडी बेचका ठेवला आहे. या बेचक्यातून वर गेल्यावर थोडे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पुढे थोडीशी सपाटी लागते. येथून डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० ते १५ मिनिटात आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. आंबेवाडीतून येथपर्यंत पोहचण्यास ८ ते ९ तास उलटून गेलेले असतात.

[next]

दुसरी वाट खिंडीतून डावीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण केल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर एक ८० ते ९० फूटाचा सरळसोट तुटलेला कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येते. प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करू नये. यावाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.

घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठीची दुसरी वाट घाटघर वरून आहे. घोटी-भंडारदरा मार्गे घाटघर गाठावे. घाटघरहून अडीच तासात किल्ल्याच्या तिसऱ्या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो.

उदडवणे गावातून: किल्ल्यावर जाण्यासाठी आणखी एक वाट आहे ती भंडारदरा मार्गे उदडवणे गावातून पठारावर येते. पुढे दुसर्‍या वाटेला येऊन मिळते.

[next]

किल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची सोय होते. जेवणाची सोय आपल्यालाच करावी लागते. तेथे बारामही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. किल्ल्यावर पोहचण्यासाठी आंबेवाडीतून ७ ते ८ तास लागतात. किल्ल्यावर जाण्याच्या वाटा अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहाणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे.


अलंग किल्ला (महाराष्ट्रातील दुर्ग - किल्ले) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची