साल्हेर किल्ला

साल्हेर किल्ला - [Salher Fort] १५६७ मी. उंचीचा साल्हेर किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेतील साल्हेर किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.

साल्हेर किल्ला - Salher Fort

साल्हेर गड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे

साल्हेर किल्ला - [Salher Fort] १५६७ मी. उंचीचा साल्हेर किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेतील साल्हेर किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा, तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेरचा. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृद्ध झालेला प्रदेश.

येथील भूमी तशी सुपीकच त्यामुळे येथील लोकांचे रहाणीमान तसे थोडे उंचावलेले. तरीही डोंगरी भागात कोकण, भिल्ल सारख्या काही आदीवासी जमाती रहातात. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ कि.मी. असून व्यापलेले क्षेत्र ६०० हेक्टर आहे.

साल्हेर किल्ल्याचा इतिहास


साल्हेर गड हा परशुरामाची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी मिळवण्यासाठी सागराला मागे हटवायला त्यांनी बाण सोडला तो याच भूमीवरून असे पौराणिक स्थान असलेल्या साल्हेरचे शिवकालीन इतिहासातील स्थान देखील महत्त्वाचे आहे ते येथे झालेल्या प्रसिद्ध लढाईमुळे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली. ते ऐकून पातशहा कष्टी झाला. नि म्हणाला, ‘काय इलाज करावा, लाख लाख घोड्याचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले. आता कोण पाठवावे.’ तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जिंवत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’ असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले.

मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बलोलखानास धरून आण.’ कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले. ’हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून येणे असे दुतर्फा चालून येऊन गनिमास गर्दीस मिळवणे’. अशी पत्रे पाठविली. त्याप्रमाणे एकीकडून प्रतापराव तर दुसरीकडून पेशवे उभयता सालेरीस आले आणि मोठे युद्ध झाले. सभासद बखरीत याचा उल्लेख खालीलप्रमाणे आढळतो. “चार प्रहर दिवस युद्ध जाहले मोगल, पठाण, रजपूत, तोफांचे, हत्ती, उंट आराबा घालून युद्ध जाहले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोश औरस चौरस, आपले व परके लोक माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले पूर वहिले. रक्ताचे चिखल जाहले. त्यामध्ये रुतो लाबले, असा कर्दम जाहला.

मराठ्यांनी इखलासकान आणि बेलोलखानाचा पाडाव केला. युद्धात प्रचंड प्रमाणावर हानी झाली. या युद्धात शिवरायांच्या एक लाख २० हजार सैन्याचा समावेश होता, पैकी १० हजार माणसे कामीस आले. सहा हजार घोड, सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना, जडजवाहीर, कापड अशी अफाट मालमत्ता शिवरायांच्या हाती आली. या युद्धात मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. मोरोपंत पेशवे आणि प्रतापरव सरनौबत यांनी आणीबाणी केली. सूर्यराव काकडे यांना पराक्रम गाजवताना आपला देह ठेवावा लागला. ते तोफेचा गोळा लागून पडले. ‘सूर्यराव काही सामान्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याचा प्रतिमेचा असा शूर पडला.’ विजयाची बातमी शिवरायांकडे गेली राजे खूप खूश झाले. खबर घेऊन आलेल्या जासूदांना सोन्याची कडी आणि प्रतापराव सरनौबत, मोरोपंत पेशवे, आनंदराव, व्यंकोजी पंत यांना अपार बक्षीस आणि द्रव्य देण्यात आले. हा पराभव दिल्लीच्या बादशहाच्या जिव्हारी लागला की सभासद म्हणतो - पातशहा असे कष्टी जाले.

‘खुदाने मुसलमानांची पातशाही दूर करून शिवाजीसच दिधली असे वाटते.’ आता समोरासमोर लढाई करून तोपर्यंत महाराजांना विजय प्राप्त झाला होता, त्यात साल्हेरचा विजय प्रथम मानावर होता. असा मोठा विजय यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या युद्धात महाराजांच्या लोकांनी दाखवलेल्या युद्धकौशल्याची व शौर्याची किर्ती चहुकडे पसरली आणि त्यांचा दरारा अधिकच वाढला. साल्हेर जिंकल्यानंतर त्यासमोरील मुल्हेर किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि संपूर्ण बागलाण प्रांतावर त्यांनी आपला शह बसवला. त्यामुळे सुरत शहरास कायमची दहशत बसली.

साल्हेर किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


वाघंबे मार्गे गडावर आल्यास उजवीकडे आणि साल्हेरवाडीतून गडावर आल्यास डावीकडे वळल्यास पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर काही भग्न पावलेल्या मंदिराचे अवशेष आढळतात. पुढे थोड्याच अंतरावर पाण्याची दोन टाकी असून समोर गंगासागर तलाव दृष्टीस पडतो. तलावाच्या बाजूलाच रेणुका मातेचे आणि गणेशाचे छप्पर नसलेले मंदिर आहे. या मंदिराच्या जवळून दोन वाटा फुटतात. उजवीकडे जाणारी वाट सरळ एका पाण्याच्या टाक्यापाशी घेऊन जाते. टाक्यांसमोरच एक यज्ञवेदी आहे. जवळच एक मूर्तीदेखील आहे. मंदिरापासून वर चढत जाणारी वाट आपल्याला तीन गुहांपाशी घेऊन जाते. गुहांच्या समोर मारूतीचे मंदिर आहे.

या गुहांमध्ये राहता येऊ शकते. गुहांशेजारची वर जाणारी वाट गडाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाते. या शिखरावर श्री परशुरामाचे मंदिर आहे. या उंच गडामाथ्यावर काहीशा ढासळलेल्या अवस्थेत असलेल्या या मंदिरात परशुरामांची मूर्ती व पादुका आहेत आणि जोडीला भान हरपून टाकणारा निसर्ग. येथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य नजरेस पडते. येथून संपूर्ण बागलाण विभाग दिसतो. हा गड डांग-गुजरात आणि बागलाण यांना जोडणाऱ्या व्यापारी वाटेवर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता. समोर दक्षिण बाजूला अजंठा-सातमाळा डोंगरातले धोडप इखारीया हे सुळके दिसतात. पूर्वेकडे मांगी-तुंगी, तांबोळ्या, न्हावीगड, हनुमान टेकडी, मुल्हेरगड, हरगड, मोरागड आणि सालोटा नजरेस पडतात. समोरच हरणबारीचे धरण लक्ष वेधून घेते.

साल्हेर गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्यासाठी प्रमुख दोन वाटा आहेत.

वाघांबे मार्गे: साल्हेरला जाण्यासाठी नाशिक-सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्ह्यातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंब अशी एस.टी. अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावा गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात. या वाटेने गडावर जाताना चार दरवाजे लागतात. तिसऱ्या ते चौथ्या दरवाजाच्या दरम्यान कड्यात खोदलेल्या १८ ते २० गुहा आहेत. चौथ्या दरवाजाच्या कमानीवर एक शिलालेख आढळतो. येथून आत आल्यावर समोरच एक पठार दिसते.

साल्हेरवाडी मार्गे: साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा-ताहराबाद-मुल्हर-साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहचतो. वाट मळलेली असल्याने चूकण्याची शक्यता नाही. या वाटे कुठेही पाणी नाही.

माळदर मार्गे: गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरत नाही. ही वाट माळदर गावातूनच जाते. सटाण्याहून एस.टी.ने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधुन जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.

राहण्याची सोय गडावर असलेल्या तीन गुहांमध्ये रहाण्याची व्यवस्थित होऊ शकते. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गंगासागर तलाव व त्याच्या बाजूला असणारी दोन पाण्याची टाकी यातील पाणी पिण्यास योग्य आहे. गडावर जाण्यासाठी वाघांबे मार्गे अडीच तास, साल्हेरवाडी मार्गे तीन तास, माळदर मार्गे तीन तास लागतात.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

ब्लॉगर
सामायिक करा


तुमच्यासाठी सुचवलेले संबंधित लेखन


नाव

अंधश्रद्धेच्या कविता,4,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,15,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,4,अनुराधा फाटक,14,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,497,अमन मुंजेकर,2,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,320,आईच्या कविता,15,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,7,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,6,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,4,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,15,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,12,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,11,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,11,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,8,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,40,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,8,कालिंदी कवी,1,काव्य संग्रह,1,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,3,किशोर चलाख,3,कुठेतरी-काहीतरी,2,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,31,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,220,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,11,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,1,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,35,देवीच्या आरत्या,3,धोंडोपंत मानवतकर,6,निखिल पवार,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,31,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,174,पावसाच्या कविता,12,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,6,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,8,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवासाच्या कविता,4,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,43,प्रेरणादायी कविता,12,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,8,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,5,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,3,भक्ती कविता,1,भाज्या,18,भाताचे प्रकार,9,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,27,मनाचे श्लोक,205,मराठी कथा,44,मराठी कविता,248,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,26,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,2,मराठी प्रेम कथा,4,मराठी भयकथा,39,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,2,मराठी सुविचार,2,मराठीमाती,401,मसाले,12,महाराष्ट्र,255,महाराष्ट्र फोटो,6,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,15,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,10,माझं मत,1,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,10,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,7,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,3,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,16,यादव सिंगनजुडे,2,योगेश कर्डीले,1,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित साठे,12,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,7,वाळवणाचे पदार्थ,5,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,26,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,2,विवेक जोशी,1,विशेष,46,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,18,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,3,शारदा सावंत,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,शेतकर्‍याच्या कविता,4,श्रद्धा नामजोशी,3,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,9,संजय पाटील,1,संजय बनसोडे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,3,संदेश ढगे,17,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कृती,120,सचिन पोटे,4,सण-उत्सव,12,सणासुदीचे पदार्थ,28,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सामाजिक कविता,34,सायली कुलकर्णी,3,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,96,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,167,स्वाती दळवी,3,स्वाती वक्ते,1,ह मुलांची नावे,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,35,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: साल्हेर किल्ला
साल्हेर किल्ला
साल्हेर किल्ला - [Salher Fort] १५६७ मी. उंचीचा साल्हेर किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. नाशिक जिल्ह्यातील सेलबारी-डोलबारी डोंगररांगेतील साल्हेर किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
https://2.bp.blogspot.com/-Q5mFltz0ND4/XbEYRR70-gI/AAAAAAAAEp0/-3ApvQnA3w4TPgNbUQk9OrIHIJUbiAXNQCLcBGAsYHQ/s1600/salher-fort.jpg
https://2.bp.blogspot.com/-Q5mFltz0ND4/XbEYRR70-gI/AAAAAAAAEp0/-3ApvQnA3w4TPgNbUQk9OrIHIJUbiAXNQCLcBGAsYHQ/s72-c/salher-fort.jpg
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2013/11/salher-fort.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2013/11/salher-fort.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy