पाश गळ्यातील तुझा - मराठी गझल

पाश गळ्यातील तुझा, मराठी गझल - [Pash Galyatil Tujha, Marathi Ghazal] पाश गळ्यातील तुझा,सोडवू कसा मी?,श्वास मनातील तुझा,जोजवू कसा मी?.

पाश गळ्यातील तुझा, सोडवू कसा मी?, श्वास मनातील तुझा, जोजवू कसा मी?

पाश गळ्यातील तुझा
सोडवू कसा मी?
श्वास मनातील तुझा
जोजवू कसा मी?

साथ तुझी ती
मजला आज रे हवीसी
गंध फुलातील तुझा
ओजवू कसा मी?

आज तुझ्या त्या सहवासात मी बुडालो
थंड तुफानास अता, टोलवू कसा मी?
आज जरा मी हसवूनी मला मिळालो
सांग तुझी प्रीत जरा योजवू कसा मी?
दुःख अकाली मजला साद देत आहे
दुःख क्षणाचे सलते, थोपवू कसा मी?
संतोष सेलुकर | Santosh Selukar
परभणी, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लिखाणाची आवड असणारे आणि व्यवसायाने शिक्षकी पेशात असलेले संतोष सेलुकर यांचा ‘दुरचे गाव’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.