खंडोबाची स्थाने

खंडोबाची स्थाने | Khandoba Places in Maharashtra

महाराष्ट्रातील खंडोबाची स्थाने

Khandoba Places | Maharashtra

म्हाळसाकांत खंडोबा

सर्वसाधारपणे प्रत्येक घराण्यात पूर्वापार पद्धतीनुसार कुलदैवत, कुलस्वामिनी आणि कुलस्वामिनी व कुलदैवत हे कुटुंबाचे दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यानुसार कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची तुळजाभवानी इ. पैकी एक कुलस्वामिनी असते. तसेच ज्या कुटुंबामध्ये एक कुलस्वामी जसे खंडोबा हे दैवत असते.

कुलदैवत व कुलस्वामिनी हे त्या त्या घराण्याची भरभराट, समृद्धी, सुखशांती देणारे आणि संरक्षण करणारे आहेत ही त्यामागची भावना. या भावनेमधून प्रत्येक व्यक्तीमध्ये या देवतांच्याविषयी अढळ श्रद्धा दिसून येते. कुठल्याही आरंभलेल्या शुभकार्याचे यशाचे श्रेय हे या तिन्ही देवतांना दिले जाते व योग्यच आहे.

कर्ता करविता कुलस्वामीच आहे व व्यक्ती हे निमित्तमात्र आहे. ही भावना व्यक्तीच्या मनात दृढ असते. तेव्हा संकटकाळी तारणारा कुलस्वामी आहे. यातून बहुतेक कुटुंबात आणि व्यक्तीच्या श्रद्धेमुळे खंडोबाची उपासना केली जाते. यासाठी खंडोबा दैवताविषयी पौराणिक माहिती समजून घेणे आवश्यक आहे.

या कलीयुगात मनुष्याच्या हातून लहान-मोठी अनेक पापे कर्मे सदैव होत असतात. अशा पाप कर्मातून मणिमल्ल आणि मल्लासुर हे दोन दैत्य बृहदेवाच्या वराने उन्मत्त होऊन मृत्यू लोकातील ऋषिजनांना त्यांनी आरंभिलेल्या धार्मिक कार्यामध्ये विघ्ने आणून उपद्रव देऊ लागले, तेव्हा या दोन दैत्यांचा संहार करण्याचे दृष्टीने ब्रह्मदेव, विष्णू आणि इन्द्र हे भगवान शंकराकडे गेले आणि त्यांनी सांगितलेल्या निवेदनावरून हे दोन दैत्य ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा दुरुपयोग करीत आहेत तेव्हा त्यांचा संहार करणेच योग्य आहे अशा भावनेतून श्री शिवशंकर क्रोधायमान झाले व त्यांनी जटा आपटून भयंकर अशा ध्रुतमारीची उत्पत्ती केली व स्वतः मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. तो दिवस चैत्री पौर्णिमेचा होता. त्यानंतर वीरभद्र, कार्तिकेय व महागणपती यांच्या अधिपत्यखाली त्यांच्या एकूण सातकोटी (येळकोट) शिवगणासह मार्तंड भैरव हे मणिमल्ल व मल्लासुर या दैत्यांचा नाश करण्यासाठी लढाईस तयार झाले. ह्या घनघोर लढाईत मार्गशीर्ष शु. प्रतिपदा ते षष्ठी या दिवशी मार्तंड भैरवाकडून हे दोन दैत्य मारले गेले. त्यामुळे षष्ठी या चंपाषष्ठी संबोधण्यात येऊ लागले व लोक मल्हारी मार्तंडाचे नवरात्र मार्गशीर्ष शु. प्रतिपदा ते मार्गशीर्ष शु. षष्ठी असे बसवू लागले. चैत्री पौर्णिमेस श्री भगवान शंकरानी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. त्यांचे वाहन नंदी असून मार्तंड भैरव यांना ४ हात असून त्यामध्ये खड्‌ग, डमरू, त्रिशूळ आणि पानमात्र असे त्यांनी धारण केलेले आहे. त्यांचे पायाशी मणिमल्ल आणि मल्लासूर यांची मुंडकी आहेत. त्यानंतर मगशीर्ष शु. ६ (चंपाषष्ठी) या दिवशी ते मल्हारी मार्तंड या नावाने जेजुरी जवळील कडेपठारावर प्रकट झाले. यास एक पौराणिक कथा आहे. ती अशी – मार्तंड भैरवाने मणीस जमिनीवर पाडले एवढ्यात मणी दैत्याने एक वर मगितला. “माझे शीर तुझे पायाखाली नित्य असू दे आणि माझे अश्वारूढ रूपही तुझ्या सान्निध्यात राहू दे. ”तसेच मल्ल दैत्याला मार्तंड भैरवाने खाली पाडले तेव्हा मरण्यापूर्वी तोही मार्तंड भैरवाला म्हणाला “देवा माझे नांव तुझ्या नावाचे आधी असावे” मल्हारी म्हणजेच मल्ल अधिक अरी. दोघांच्या विनंतीस मार्तंड भैरवाने तथास्तु म्हटले.

मल्हारी मार्तंडाचा एक भक्त दर रविवारी कडेपठार येथे दर्शनासाठी जात असे. वयोमानानुसार मार्गाच्या अर्ध्या वाटेवर असलेल्या घोडे उड्डाणाच्या पुढे त्यास पुढे जाणे कठीण झाले. ही अवस्था पाहून मल्हारी मार्तंडाने त्या भक्तास दृष्टांत दिला की, तुला यापुढे माझे दर्शनासाठी एवढ्या लांबवर येण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी मीच तुझ्या दर्शनासाठी कडेपठार सोडून नवलाख पायऱ्या असलेल्या टेकडीवर सयंभू लिंग म्हणून प्रकट होत आहे. या ठिकाणालाच सध्याचे जेजुरी देवस्थान म्हणतात.

१२ ज्योर्तिर्लिंगे, अष्टविनायक, ११ मारुती, ३॥ देवीची पीठे, याचप्रमाणे महाराष्ट्रात ७ व कर्नाटकात ५ अशी खंडोबाची १२ तीर्थक्षेत्रे आहेत. महाराष्ट्रातील रहिवासी खंडोबा या नावाने व कर्नाटकातील रहिवासी श्री. मल्ल्या या नावाने ओळखतात.

द्वादश मल्हारी म्हाळसाकांत मल्ल्या यांची ठिकाणे खालीलप्रमाणेः
  • जेजुरी (पुणे)
  • पाली (सातारा)
  • मंगसुळी (बेळगाव)
  • देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
  • मैलार लिंगप्पा (खानापूर) (बेल्लारी)
  • मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा)
  • आदि मैलार (बीदर)
  • अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद)
  • माळेगाव (नांदेड)
  • सातारे (औरंगाबाद)
  • शेगुड (अहमदनगर)
  • निमगाव दावडी (पुणे)
  • अणदूर (नळदुर्ग, उस्मानाबाद जिल्हा)
  • आदी मैलार (गुलबर्गा विभाग, बीदर जिल्हा, कर्नाटक)
  • काळज (ता. फलटण, सातारा जिल्हा)
  • जेजुरी - खंडोबा देवाचे मुख्य पीठ (पुणे जिल्हा)
  • देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
  • निमगाव दावडी (पुणे जिल्हा)
  • पाली (सातारा जिल्हा)
  • पिंपळगाव निपाणी (निफाड तालुका, नाशिक जिल्हा)
  • पिंपळगाव रोठा (पिंपळगाव रोठा)
  • मंगसुळी (बेळगाव जिल्हा)
  • ममुराबाद प्रति जेजुरी देवस्थान (जळगाव)
  • माळेगाव (नांदेड जिल्हा)
  • मैलार लिंगप्पा (खानापूर, बेळगाव जिल्हा)
  • मैलारपूर (यादगीर, बेळ्ळारी जिल्हा)
  • सातारे (औरंगाबाद जिल्हा)
  • शेगुड (अहमदनगर जिल्हा)


  सामायिक करा


महाराष्ट्र        सैरसपाटा
नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,6,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,754,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,1,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर देशपांडे,1,अक्षरमंच,530,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,11,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,8,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,15,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,42,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,259,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,28,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,54,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निराकाराच्या कविता,5,निसर्ग कविता,14,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,203,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,8,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक बळी,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रज्ञा वझे-घारपुरे,2,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,69,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,8,भक्ती कविता,2,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,70,मराठी कविता,414,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,11,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,16,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,21,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,387,मसाले,12,महाराष्ट्र,266,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,11,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,38,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,8,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,8,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,18,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदेश ढगे,37,संपादकीय,12,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कार,1,संस्कृती,123,सचिन पोटे,8,सचिन माळी,1,सण-उत्सव,14,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,49,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुदेश इंगळे,2,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,196,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,14,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
static_page
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: खंडोबाची स्थाने
खंडोबाची स्थाने
खंडोबाची स्थाने - [Khandoba Places in Maharashtra] महाराष्ट्रातील सर्व खंडोबाची स्थाने.
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/p/khandoba.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/p/khandoba.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची