Loading ...
/* Dont copy */

अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र)

अहमदनगर जिल्हा - [Detailed Information and Photos of Ahmednagar District] अहमदनगर जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.

अहमदनगर जिल्हा | Ahmednagar District

राज्यातील मध्यवर्ती म्हणावे असे स्थान अहमदनगर जिल्ह्यात लाभले आहे


अहमदनगर जिल्हा

अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात कैदेत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

इ. स. १४१८ मध्ये मलिक अहमद याने वसविलेले निजामशाहीच्या राजधानीचे शहर पुढे मलिक अहमदच्या नावावरून ‘अहमदनगर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आलेल्या या शहराच्या नावावरून जिल्ह्यालाही अहमदनगर जिल्हा म्हणून संबोधले जाऊ लागले.

चारही बाजूंनी मोठमोठे खंदक असलेला अहमदनगरचा भुईकोट किल्ला इतिहासात प्रसिद्ध आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात याच किल्ल्यात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल व मौलाना आझाद यासारख्या नेत्यांना इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. याच किल्ल्यात कैदेत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

सहकारी चळवळीत देशात महाराष्ट्र अग्रेसर असून अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे प्रवरानगर (लोणी) येथे उभा राहिला. हा कारखाना आता ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना’ म्हणूनच ओळखला जातो.

सहकारी तत्त्वावरील सर्वाधिक साखर कारखाने राज्यात याच जिल्ह्यात आहेत.

‘अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ ही सहकारी क्षेत्रातील आशिया खंडातील सर्वात मोठी बँक ठरावी.

मुख्य ठिकाण: अहमदनगर
तालुके: तेरा
क्षेत्रफळ: १७,०४८ चौ. कि. मी.
लोकसंख्या: ३३,७२,९३५


अहमदनगर जिल्ह्याचे भौगोलिक स्थान


राज्यातील मध्यवर्ती म्हणावे असे स्थान या जिल्ह्यात लाभले आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद हे जिल्हे असून पूर्वेस बीड जिल्हा आहे. उस्मानाबाद जिल्हा अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस किंबहुना काहिसा आग्नेयेस पसरलेला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेस व काहीशा आग्नेयेस सोलापूर जिल्हा वसलेला असून जिल्ह्याच्या दक्षिणेस, नैऋत्येस व बऱ्याचशा प्रमाणात पश्चिमेस पुणे जिल्हा पसरलेला आहे. ठाणे जिल्हा अहमदनगर जिल्हाच्या पश्चिमेस आहे.

राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ५.५४ टक्के इतके क्षेत्र या जिल्ह्याने व्यापले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील तालुके

अहमदनगर जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत
  1. अहमदनगर
  2. राहुरी
  3. श्रीरामपूर
  4. नेवासे
  5. शेवगाव
  6. पाथर्डी
  7. जामखेड
  8. कर्जत
  9. श्रीगोंदे
  10. पारनेर
  11. अकोला
  12. संगमनेर
  13. कोपरगाव

अहमदनगर जिल्ह्याची प्राकृतिक रचना


सह्य पर्वताचा डोंगराळ भाग किंवा सह्य पर्वताच्या अनेक रांगा-उपरांगा जिल्ह्याच्या पश्चिम भागात- विशेषत्वाने अकोले व संगमनेर तालुक्यात पसरलेल्या आहेत. अकोले तालुक्यात या पर्वतरांगांनी उंची तुलानात्मकदृष्ट्या अधिक आहे. सह्य पर्वताच्या काही रांगा जिल्ह्यातून दक्षिण-उत्तर गेल्या असून काही फाटे पश्चिमेकडून पूर्वेकडे गेले आहेत. सर्वांत उत्तरेकडे असलेल्या सह्य पर्वताच्या रांगेत अकोला तालुक्यात (किंबहुना अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर) ‘कळसूबाई’ हे राज्यातील सर्वोच्च शिखर वसले आहे. या शिखराची उंची सुमारे १,६४६ मीटर इतकी आहे. अदुला बाळेश्वर व हरिश्चंद्रगड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगररांगा याच भागात आहेत.

अहमदनगर जिल्ह्याचा मध्यभाग पठारी प्रदेशाचा असून या पठारास ‘बालाघातचे पठार’ म्हणून ओळखले जाते. संगमनेर तालुक्याचा दक्षिण भाग, पारनेर व अहमदनगर हे तालुके तसेच श्रीगोंदे व कर्जत या तालुक्यांचा उत्तर भाग या विभागात मोडतो. जिल्ह्यातील उत्तर भाग गोदावरी व प्रवरा आणि त्यांच्या उपनद्यांच्या जलनिस्सारणाचा आहे. या सपाट मैदानी प्रदेशात श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगाव व नेवासे हे तालुके वसले असून पाथर्डी व राहुरी या तालुक्यांचा काही भागही याच विभागात मोडतो.

अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग घोड, भीमा व सीना नद्यांचे खोरे म्हणूनच ओळखला जातो. श्रीगोंदे, कर्जत व जामखेड या तालुक्यांचा बहुतांश भाग व पारनेर तालुक्यांचा दक्षिणेकडील भाग या प्रदेशात समाविष्ट होतो.

अहमदनगर जिल्ह्यातील मृदा


दख्खन पठाराचा हा जिल्हा ज्वालामुखीय लाव्हापासूनच बनला आहे. जिल्ह्यातील डोंगर‍उतारावर काळी लाल दगड-गोठे मिश्रित मृदा आढळते. प्रवरेच्या खोऱ्यातील व विशेषतः संगमनेर तालुक्यातील मृदा खोल, गाळाची व अतिशय सुपीक असल्याचे दिसून येते. या मृदेची ओलावा टिकवून धरण्याची क्षमता अधिक आहे. गोदावरी खोऱ्यातील मृदा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून तयार झालेली असून कापसाच्या पिकासाठी ही अधिक उपयुक्त ठरते. जिल्ह्यात नद्यांच्या काठी पोयट्याची पांढरट मृदा आढळून येते. जिल्ह्याच्या डोंगराळ प्रदेशात विशेषतः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात तांबडी मृदा आढळते.


क्षेत्रफळाच्या विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे विभाजन करून अहमदनगर श्रीरामपूर हे दोन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव शासकीय स्तरावर विचाराधीन असून असे विभाजन झाल्यास मात्र राज्यातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्यास ओळखता येणार नाही.

अहमदनगर जिल्ह्याचे हवामान


अहमदनगर जिल्हा समुदरकिनाऱ्यापासून दूर असल्यामुळे साहजिकच, जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ भागातील हवामान तुलनात्मकदृष्ट्या थंड आहे. ‘भंडारदरा’ हे थंड हवेचे ठिकाण अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात वसले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील दैनिक व वार्षिक तापमानकक्षेत खूपच तफावत आहे. मे महिन्यात जिल्ह्यातील सर्वोच्च तापमान दर्शविले जाते, तर जानेवारी महिन्यात ४० डिग्री से. पर्यंत वाढते तर जानेवारी महिन्यात ते १२ डिग्री से. पर्यंत कमी होते. सह्याद्रीच्या पूर्व भागात वसलेल्या या जिल्ह्याचा बहुतेक भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो. जिल्ह्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या कालखंडात पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण सरासरी ६८ डिग्री सें. इतके आहे. पाऊस पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी-कमी होत जातो. अकोले तालुक्यात तुलनात्मकदृष्ट्या अधिक पाऊस पडतो.

सुखटणकर समितीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील अहमदनगर, अकोला, जामखेड, पारनेर, पाथर्डी, संगमनेर, शेवगाव, नेवासे व कर्जत हे दहा तालुके अवर्षणग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आलेले असून १९७४ - ७५ पासून या तालुक्यामध्ये अवर्षणवन क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नद्या


गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी होय. नाशिक जिल्ह्यातून ती कोपरगाव तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यात प्रवेशते. तिचा जिल्ह्यातील प्रवास साधारणतः पश्चिमेकडून पूर्वेकडे असा होतो. सुरुवातीस कोपरगाव तालुक्याच्या मध्यापासून वाहणारी ही नदी नंतर श्रीरामपूर, नेवासे व शेवगाव या तालुक्यांच्या सीमावार्ती भागातून वाहताना औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यांमधील सीमा निश्चित करते. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून प्रवास करताना काही वेळा तिने औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात प्रवेश करून पुन्हा अहमदनगर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात प्रवेश केलेला आहे. गोदावरीच्या जिल्ह्यातील प्रवाह सुमारे १५० कि.मी. लांबीचा आहे. प्रवरा व ढोरा या गोदावरीच्या प्रमुख उपनद्याही जिल्ह्यातून वाहातात. अकोले तालुक्याच्य पश्चिमेकडील डोंगराळ भागात उगम पावून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहात जाणाऱ्या प्रवरेचा जिल्ह्यातील प्रवास अकोले, संगमनेर, श्रीरामपूर व नेवासे या तालुक्यांमधून होतो. नेवासे तालुक्याच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागात ही नदी गोदावरीस मिळते. हे स्थळ ‘प्रवरासंगम’ म्हणूनच ओळखले जाते. अदुला, महाळुंगी व मुळा या प्रवरेच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहातात.


अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथे मोसंबी फळाचे संशोधन केंद्र आहे.

प्रवरेचा जिल्ह्यातील प्रवाह सुमारे १७५ कि.मी. लांबीचा आहे. अकोले व नेवासे ही प्रमुख स्थळे प्रवरेकाठी वसली आहेत. मुळा नदी अकोले, संगमनेर व राहुरी या तालुक्यांतून वाहात जाऊन नेवाशाजवळ प्रवरा नदीस मिळते. भीमा नदी श्रीगोंदे व कर्जत या तालुक्यांच्या सीमेवरून वायव्येकडून आग्नेयेकडे वाहात जाते. आपल्या प्रवासात काही काळ तिने अहमदनगर व पुणे या जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. घोड व सीना या जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमेच्या उपनद्या होत. पुणे जिल्ह्यातून या जिल्ह्यात प्रवेश करणारी घोडनदी जिल्ह्यातून पारनेर व श्रीगोंदे या तालुक्यांच्या सीमेवरून उत्तर-दक्षिण किंबहुना वायव्य-आग्नेय असा प्रवास करते. कुकडी ही घोडनदीची उपनदी पारनेर तालुक्यातून वाहते. पारनेर तालुक्यातील निघोज या गावाजवळ कुकडीच्या पात्रात असलेले रांजण-खळगे प्रेक्षणीय आहेत. सीना या भीमेची उपनदी अहमदनगर तालुक्यात उगम पावते व अहमदनगर शहरातून वायव्येकडून आग्नेयेकडे असा प्रवास करीत पुढे सोलापूर जिल्ह्यात प्रवेशते. सीना नदीच्या जिल्ह्यातील प्रवाह सुमारे १०० कि.मी. लांबीचा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील धरणे


प्रवरा नदीवर अकोले तालुक्यात भंडारदरा येथे मोठे धरण बांधण्यात आले आहे. श्रीरामपूर, राहुरी व संगमनेर या तालुक्यांना या धरणाचा लाभ मिळतो. मुळा नदीवर राहुरी तालुक्यात बारागाव-नांदूर येथे मुळा प्रकल्प उभारण्यात आला आहे. राहुरी, नेवासे व शेवगाव या तालुक्यातील डिभे जलाशयाचा लाभही अहमदनगर जिल्ह्यास होतो. वरील मोठ्या प्रकल्पाशिवाय जिल्ह्यात आढळ नदीवर अकोले तालुक्यात देवठाणा, सीना नदीवर कर्जत तालुक्यात निमगाव येथे धरणे आहेत. याशिवाय पारनेर तालुक्यात मांडओहळ येथे व पाथर्डी तालुक्यात पारगाव-घाटशील येथे धरण आहेत. जिल्ह्यात विसापूर, भातोडी, गुणवडी, मुसळवाडी असे अनेक तलाव आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील पिके


बाजरी, भुईमूग व तूर ही जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिके होत; तर करडई, गहू व हरभरा ही प्रमुख रबी पिके होत. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पिक असून ते दोन्ही हंगमात घेतले जाते.

संगमनेर, पाथर्डी, पारनेर व शेवगाव हे तालुके बाजरीच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. श्रीरामपूर, कोपरगाव व राहुरी हे तालुके खरीप ज्वारीच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे गणले जातात. श्रीगोंदे, पारनेर, कर्जत व अहमदनगर या तालुक्यात रबी ज्वारी मोठ्या प्रमाणावर घेतली जाते.


विटा व चंदनापुरी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे घाट होत. संगमनेरहून रंधा धबधब्याकडे जाताना विटा घाट लागतो, तर संगमनेरहून पुण्याकडे येताना चंदनापुरी घाट ओलांडावा लागतो.

गव्हाच्या उत्पादनाच्या दृष्टीनेही अहमदनगर जिल्हा महत्त्वाचा असून कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, राहुरी व अहमदनगर या तालुक्यांमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

भुईमूग व करडई ही जिल्ह्यातील गळिताची प्रमुख पिके असून या पिकांच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या जिल्ह्यापैकी अहमदनगर एक गणला जातो. भुईमूगाचे पिक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्रच घेतले जाते. पारनेर, श्रीगोंदे व जामखेड हे तालुके करडईच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे मानले जातात. अलीकडे सूर्यफुलाच्या उत्पादनाचेही आकर्षण वाढत असून गेल्या दहा-पंधरा वर्षांत सुर्यफुलांच्या लागवडीखालील क्षेत्रात जिल्ह्यात बरीच वाढ झालेली आहे. राज्यातील सुर्यफुलांच्या एकूण उत्पादनापैकी पंधरा टक्क्यांहून अधिक उत्पादन अहमदनगर जिल्ह्यात होते.

हरभरा व तूर ही जिल्ह्यात घेतली जाणारी प्रमुख कडधान्ये होत. राहुरी, शेवगाव, पारनेर व अहमदनगर हे तालुके तुरीच्या उत्पादनाच्या दृष्टीनेतर नेवासे, अहमदनगर, राहुरी, शेवगाव व पाथर्डी हे तालुके हरभऱ्याच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे गणले जातात.

उसाखालील क्षेत्र व उसाचे उत्पादन या दोन्हीही दृष्टीने अहमदनगर जिल्हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठरतो. राज्यातील एकूण ऊस उत्पादनात या जिल्ह्याचा वाटा तेरा टक्क्यांहून अधिक असून राज्यातील उसाखालील बारा टक्क्यांहून अधिक क्षेत्र या जिल्ह्यात आहे. राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर व शेवगाव हे तालुके ऊस-उत्पादनात अग्रेसर आहेत.

अलीकडील काळात जिल्ह्यात फलोत्पादनाकडेही लोकांचा कल वाढता आहे. कोपरगाव, संगमनेर, पाथर्डी, राहुरी व अहमदनगर या तालुक्यांमध्ये द्राक्षांच्या अनेक बागा आसून कोपरगाव तालुका द्राक्ष-उत्पादनात आघाडीवर आहे. अहमदनगर येथे डाळिंबाच्या व श्रीरामपूर येथे मोसंबीच्या बागा आहेत.

जिल्ह्यात उत्पादीत होणाऱ्या शेवंतीच्या फुलांना राज्यात व राज्याबाहेर मोठी मागणी आहे. पारनेर व अहमदनगर हे तालुके शेवंतीच्या फुलांच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील खनिजे


अहमदनगर जिल्ह्यात महत्त्वाची खनिजे नाहीत. दगड, माती व मुरुम ही गौण खनिजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असून त्यांचा बांधकामासाठी उपयोग होतो.


कोपरगाव तालुक्यातील साखर कारखान्यांची संख्या लक्षात घेता कोपरगावला ‘भारताची साखरपेठ’ म्हणूनच ओळखले जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील वने


एकूण भु-क्षेत्राच्या दहा टक्के क्षेत्र वनव्याप्त आहे. पर्यावरण संतुलनासाठी एकून भू-क्षेत्राच्या तेहतीस टक्के क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता हे क्षेत्र बरेच कमी असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील वने विरळ असून वनक्षेत्र मुख्यत्वे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात व दऱ्याखोऱ्यांमध्ये विखुरलेले आहे. साग, बाभूळ, धावडा, हलदु, कडुलिंब, आंबा, चिंच, आवळा, बोर यांसारखी झाडे येथील वनांत आहेत. लांडगे, ससे, व हरीणे हे प्राणी तसेच मोर, कोकीळ व खंड्या हे पक्षी येथील वनांमध्ये आढळतात. कर्जत, श्रीगोंदे व नेवासे या तालुक्यांमध्ये माळढोक पक्षी सापडतात. कर्जत तालुक्यातील देऊळगाव-रेहेकुरी येथील अभयारण्य काळवीटांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील उद्योगधंदे


औधोगिकदृष्ट्या जिल्ह्याचे वर्णन विकसनशील असे करावे लागेल. साखर उद्योगाच्या दृष्टीने हा जिल्हा महत्त्वाचा असून साखरेच्या उत्पादनात जिल्ह्याचा राज्यात पहिला क्रमांक लागतो.

श्रीरामपूर तालुक्यात अशोकनगर (कोरेगाव) येथे अशोक सहकारी साखर कारखाना, कोपरगाव तालुक्यात गणेशनगर (रांजणगाव) येथे श्रीगणेश सहकारी साखर कारखाना, कोपरगाव तालुक्यात गौतमनगर (कोळपेवाडी) येथे कोपरगाव सहकारी साखर कारखाना; श्रीरामपूर तालुक्यात प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखाना; राहुरी तालुक्यात राहुरीजवळ श्रीशिवाजीनगर येथे राहुरी सहकारी साखर कारखाना; कोपरगाव तालुक्यात सहजानंदनगर (शिंगणापूर) येथे संजीवनी सहकारी साखर कारखाना; संगमनेर तालुक्यात संगमनेरजवळ अमृतनगर येथे संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना, नेवासे तालुक्याट ज्ञानेश्वरनगर (भेंडे) येथे श्रीज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, पाथर्डी तालुक्यात आदिनाथनगर येथे श्रीवृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना; कर्जत तालुक्यात राशीनजवळ श्रीजगदंबा सहकारी साखर कारखाना; पारनेर तालुक्यात देवीभोयरे येथे पारनेर तालुका सहकारी साखर कारखाना; पाथर्डी तालुक्यात पाथर्डीजवळ केदारेश्वर सहकारी साखर कारखाना हे सहकारी तत्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर व राहुरी येथे सूत गिरण्या आहेत. कोपरगाव व कान्हेगाव येथे औषधांचे कारखाने आहेत. अहमदनगर, संगमनेर, पाथर्डी व शेवगाव येथे जिनिंग-प्रेसिंगच्या गिरण्या आहेत. १९७२ नंतर औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असलेल्या अहमदनगर येथे कायनेटिक कंपनीचा मोपेडचा कारखाना, व्हिडीओकॉन कंपनीचा दूरचित्रवाणी संच निर्मितीचा कारखाना व आयुर्वेदिक औषधांचा एक कारखाना असून गरवारे नायलॉन, क्रॉम्प्टन ग्रीव्ह्‌ज, इंडियन सिमलेस, अहमदनगर फोर्जिंग, सेल्को आदी कंपन्यांनी आपले प्रकल्प येथे उभारले आहेत. अहमदनगर येथे एक दूध शीतकरण केंद्रही आहे.

याशिवाय कृषी आधारित अनेक लहान-मोठे उद्योग जिल्ह्यात विखुरलेले आहेत. अकोले तालुक्यात हातसडीच्या तांदुळाचा उद्योग चालतो. अहमदनगर, भिंगार, पाथर्डी, संगमनेर व खर्डे येथे हातमाग-यंत्रमाग उद्योग प्रचलित आहे. घोंगड्या विणण्याचा उद्योग संगमनेर, कर्जत व पाथर्डि या तालुक्यांमध्ये पसरलेला असून अहमदनगर, संगमनेर येथे तेल गिरण्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर, श्रीरामपूर व संगमनेर येथे औद्योगिक वसाहती आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख स्थळे


अहमदनगर: जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असलेले शहर. शहरातील भुईकोट किल्ला व शहराजवळच असलेला चांदबीबीचा महाल ही ऐतिहासिक स्थळे. शहराजवळ भिंगार येथे लष्करी छावणी आहे. अहमदनगर येथे लष्कराचा वाहन-संशोधन व विकास विभाग आहे. भारतीय सैन्याचे रणगाडा प्रशिक्षण केंद्रही येथे आहे.

अकोले: हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून ते प्रवरा-नदीकाठी वसलेले आहे. येथील अगस्ति ऋषींचा आश्रम प्रसिद्ध आहे. अकोले येथील गंगाधरेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

श्रीरामपुर: तालुक्याचे मुख्य ठिकाण. साखरेची मोठी बाजारपेठ व रेल्वे स्थानक येथे मोठी औद्योगिक वसाहतही आहे.

प्रवरानगर: राज्यातील सहकारी चळवळीचे एक प्रमुख केंद्र. देशातील पहिला सहकारी साखर कारखाना येथेच उभा राहिला. अलीकडील काळात एक शैक्षणिक केंद्र म्हणूनही प्रवरानगर विकसित होत आहे.

नेवासे: तालुक्याचे मुख्य ठिकाण. प्रवरा नदीकाठी वसले आहे. येथेच संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली. ज्या खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबास ‘पैस’ असे संबोधले जाते. त्या खांबाभोवतीच संत ज्ञानेश्वर मंदिर बांधण्यात आले आहे. मोहिनीराजाच्या प्राचीन मंदिरासाठीही नेवासे प्रसिद्ध आहे.


सर्वात मोठे अवर्षण-प्रवण क्षेत्र असलेला हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक सिंचनक्षेत्र असलेला जिल्हाही आहे.

शनि-शिंगणापूर: हे स्थळ अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर अहमदनगरपासून सुमारे ५० कि. मी. अंतरावर नेवासे तालुक्यात आहे. येथील शनिमंदिर प्रसिद्ध आहे. शिला-स्वरूपातील शनिदेवाची स्वयंभू मूर्ती मंदिराबाहेर आहे. येथे शनि-अमावस्येला मोठी यात्रा भरते. गावातील कोणत्याही घराला दरवाजे-कड्या नाहीत. हे या स्थळाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य होय.

राहुरी: मुळा नदीकाठी वसलेले हे शहर राहुरी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. जवळच श्रीशिवाजीनगर येथे सहकारी तत्त्वावरील राहुरी सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे. राहुरी येथील कागद गिरणीही प्रसिद्ध आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही राहुरी ओळखले जाते. राहुरी विद्यापीठाने संशोधित करून प्रचलित केलेल्या अनेक पिकांच्या जाती राज्यात लोकप्रिय आहेत.

राळेगण-सिद्धी: पूर्वी ‘राळेगण शिंदी’ या नावाने ओळखले जाणारे हे गाव पारनेर तालुक्यात आहे. अत्यंत अविकसिअ असलेल्या या खेड्याचा थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या अथक परिश्रमातून कायापालट घडवून आणला. माणूस हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानून अण्णांनी आज या अविकसित खेड्याचे परिवर्तन भारतातीलच नव्हे तर आशियातीलही आदर्श अशा गावात केले आहे. संपूर्ण व्यसनमुक्त असलेले हे गाव सामाजिक वनीकरण, कुटुंबकल्याण व शिक्षण अशा अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे.

पारनेर: तालुक्याचे मुख्य ठिकाण. सेनापती बापटांची जन्मभूमी. जवळच देवी-भोयरे येथे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना.

पुणतांबे: हे गाव कोपरगाव तालुक्यात गोदावरीकाठी वसले आहे. येथे चांगदेवांची समाधी आहे.

शिर्डी: कोपरगाव तालुक्यात वसलेले हे ठिकाण अनेक साईभक्तांचे श्रद्धास्थान आहे. देशभरातून सर्वधर्मीय लाखो भक्तगण येथे श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी येतात.

सिद्धटेक: अष्टविनायकांपैकी एक गणले जाणारे हेस्थान कर्जत तालुक्यात आहे. येथील गणपतीस श्रीसिद्धीविनायक म्हणून संबोधले जाते.

भंडारदरा: अकोले तालुक्यात कळसूबाई व बाळेश्वर या टेकड्यांच्या दरम्यान येथे प्रवरा नदीवर ‘भंडारदरा’ हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणास पूर्वी ‘विल्सन बंधारा’ म्हणून ओळखले जाई, तर धरणाच्या जलाशयास ‘आर्थर सरोवर’ म्हणून संबोधले जाई. हे धरण जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवरील धरण आहे. निसर्गरम्य परिसरामुळे हे थंड हवेचे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणस्थळ बनले आहे. भंडारदऱ्याच्या पूर्वेस नऊ कि.मी. अंतरावर भंडारदरा धरणातून सोडलेल्या (प्रवरेच्या) पाण्यामुळे निर्माण झालेला रंधा हा प्रसिद्ध धबधबा आहे. प्रवरेचे पाणी येथे साठ मीटर खोल कोसळते.

याशिवाय कोपरगाव (तालुक्याचे मुख्य ठिकाण व साखर कारखाने.) खर्डे (जामखेड तालुक्यात. भुईकोट किल्ला.); मढी (पाथर्डी तालुक्यात कानिफनाथ मंदिर.); देऊळगाव-रेहेकुरी (कर्जत तालुक्यात. काळविटांसाठी राखीव अभयारण्य.); श्रीगोंदे (तालुक्याचे मुख्य ठिकाण. शेख महंमद यांची समाधी.); अरणगाव (अहमदनगर तालुक्यात. अवतार मेहेरबाबांची समाधी.); हरीश्चंद्रगड (अहमदनगर, पुणे व ठाणे या जिल्ह्याच्या सीमेवरील प्राचीन डोंगरी किल्ला.); रतनगड (अकोले तालुक्यातील डोंगरी किल्ला.); निघोज (पारनेर तालुक्यात. कुकडी नदीच्या पात्रातील रांजणखळगे प्रसिद्ध. मळगंगा देवीचे मंदिर. ); वडगाव दर्या व देवी दर्या (पारनेर तालुक्यात. चुनखडकाचा प्रदेश. भू-जलामुळे निर्माण झालेल्या गुहा प्रसिद्ध.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.

अहमदनगर जिल्ह्यातील वाहतुक


पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास संगमनेर तालुक्यातून जातो. घारगाव, डोळासणे व संगमनेर ही या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत. पुणे-औरंगाबाद हा राज्य महामार्ग पारनेर, अहमदनगर व नेवासे या तालुक्यात जातो. अहमदनगरहून निघालेला एक रस्ता राहुरी, कोल्हार, बाभळेश्वर, राहते, शिर्डी व कोपरगावहून पुढे मनमाडला जातो.

अहमदनगर-पैठण हा रस्ता तिसगाव-शेवगावमार्गे पैठणला जातो. अहमदनगरहून निघणारा आणखी एक रस्ता मिरजगावमार्गे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याला व पुढे सोलापूरला जातो.

दौंड-मनमाड हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा लोहमार्ग होय. या लोहमार्गावर श्रीगोंदे, विसापूर, अहमदनगर, श्रीरामपूर व पूणतांबे ही जिल्ह्यातील प्रमुख स्थानके आहेत.


प्रशासकीय कार्यपद्धतीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणणाऱ्या ‘लखीना पॅटर्न’ या रचना व कार्यपद्धतीचा पहिला प्रयोग अहमदनगर निल्ह्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी श्री अनिलकुमार लखीना यांनी अहमदनरगच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केला.

अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1347,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1087,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,5,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,69,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1130,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र)
अहमदनगर जिल्हा (महाराष्ट्र)
अहमदनगर जिल्हा - [Detailed Information and Photos of Ahmednagar District] अहमदनगर जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgW9Vm61DQDtp-xSDQm0tMwksraFoCJYa-JeG-IYPr37TNtXw_vgRfwh3uodhvxXaH4SXMuDeDoQDkNeH_VwwyNRNtZkcMGI1dbC_4OEgOhnAn6SXC-afno9pFO4RT8BEIacXV4cbZBc6-bQ-memmy-ntsg0yy5rJIWBJ9zJE6R97m2LkhT3uXmFay8Q/s1600-rw/ahmednagar-district.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgW9Vm61DQDtp-xSDQm0tMwksraFoCJYa-JeG-IYPr37TNtXw_vgRfwh3uodhvxXaH4SXMuDeDoQDkNeH_VwwyNRNtZkcMGI1dbC_4OEgOhnAn6SXC-afno9pFO4RT8BEIacXV4cbZBc6-bQ-memmy-ntsg0yy5rJIWBJ9zJE6R97m2LkhT3uXmFay8Q/s72-c-rw/ahmednagar-district.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/09/ahmednagar-district.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/09/ahmednagar-district.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची