Loading ...
/* Dont copy */

अपराध सहस्राणि क्रियन्ते अहम् - मराठी कविता (गणेश तरतरे)

अपराध सहस्राणि क्रियन्ते अहम् (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी गणेश तरतरे यांची अपराध सहस्राणि क्रियन्ते अहम् ही मराठी कविता.

अपराध सहस्राणि क्रियन्ते अहम् - मराठी कविता

ती भळभळणारी जखम माथ्यावरची...

अपराध सहस्राणि क्रियन्ते अहम्

डॉ.गणेश तरतरे (लेखक सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई येथे चित्रकलेचे प्राध्यापक आहेत)

आठवण करून देत असेल ती भळभळणारी जखम माथ्यावरची अश्वत्थाम्याला अपराधाची तशीच जाणीव मलाही होतं आहे कुणाचातरी केला अपमान दुःख दिले अनेकांना मनाविरुद्ध वागलो सर्वांच्या अहंकाराच्या अंधाराने आंधळा होतो कधी दान नाही केले पुण्य नाही कमवलं साधी मदत देखिलं केली नाही होत करंटेपण माथ्यावर कोरलेलं माझ्या इतिहासाने गर्व पेरला परंपरांचा दंभ आणला आणी केले संस्कृतीचे अवडंबर इथे माणूसपन हरपून बसलो कधी कुणासाठी बनलो नाही तहान भागवणारी ओंजळ पोटाची खळगी भरणारा घास इथे पाझरलो नाही, मी दगड कधी आड आली माझी बुद्धी आणि स्वार्थ अभिमान आणि गर्व कधी आड आल्या त्यांच्या अवास्तव आशा आणि माझ्या वास्तव मर्यादा कोंडला नसेन कुणाच्या गर्भाचा मी श्वास परंतु झालेले अपराध त्याहुन कमी आहेत का? ते असो काहीही वळून मागे पाहता अपराधांचे डोंगर दिसतात अपराध सहस्राणि क्रियन्ते अहम् तशीच जाणीव मलाही होतं आहे जशी अश्वत्थाम्याला अपराधाची परंतू ती भळभळणारी जखम माथ्यावर नाही माझ्या काळजावर आहे

गणेश तरतरे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची