अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावात असलेल्या प्राचीन गंगाधरेश्वर मंदिराची छायाचित्रे
गंगाधरेश्वर मंदिर - (Gangadhareshwar Temple) अकोले, अहमदनगर येथील इ. स.१७८२ (शके १७०३) प्रशस्त व सुंदर श्रीगंगाधरेश्वराचे मंदिर शके १७०३ म्हणजे इ. स. १७८२ मध्ये श्री. अंबादास पोतनीस (संत) यांनी बांधायल सुरूवात केली. (संदर्भ: ऐतिहासिक कागदपत्रे व बॉम्बे गॅझेटियरनुसार) शिल्लक काम त्यांचे चिरंजीव श्री. अमृतराव कृष्णाजी पोतनीस यांनी पूर्ण केले. मंदिर प्रकल्पाचा खर्च अंदाजे रूपये ४ लक्ष झाला आहे.
देवालयाची उंची ५४ फुट असून लांबी ७५ फुट व रूंदी ३५ फुट आहे. गंगाधरेश्वर मंदिराच्या बांधकामात वापरलेला दगड प्रवरेकडील टेकड्यांवरून गाड्यावर वाहून आणण्यात आला आहे.
श्रीगंगाधरेश्वराचे देवालय विमानपद्धतीच्या वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे. शिल्पज्ञ जयपुर - उदयपुर राजस्थानकडील होते. कारणा श्री. कष्णाजी अंबादास पोतनीस इ. स. १७६८ मध्ये ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) च्या श्रीमंत महादजी शिंदे यांच्या समवेत राजपुताना स्वारीत सहभागी होते, त्यामुळे राजस्थानकडील कलेचा परिचय त्यांना झाला होता.
गंगाधरेश्वर मंदिर - अकोले, अहमदनगर - फोटो
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा