प्रेम हे नावावर नसतं - भाग ५ - मराठी कथा

प्रेम हे नावावर नसतं - भाग ५,मराठी कथा - [Prem He Navavar Nasata - Part 5,Marathi Katha] तिला भीती वाटत असते त्यामुळे तीचं अंग थरथरत असतं.
प्रेम हे नावावर नसतं - भाग ५ - मराठी कथा | Prem He Navavar Nasata - Part 5 - Marathi Katha

त्यांची पहेली भेट

पार्टी आटोपून ती रूममध्ये परत येते. त्या हेवी ड्रेस आणि गेटअपमधे तिला खूप थकल्यासारखं वाटत असतं मुळात तिला या सगळ्यांची सवय नसते. ती ड्रेस चेंज करते आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूमधे जाते बघते तर काय बाथरूम मध्ये मोठा बाथटब असतो तिला तो बाथटब बघून जरा जास्तीच थकवा जाणवतो ती काही वेळ बाथटब मध्ये बसायचा प्लॅन करते तशी ती बाथटब मधे गरम पाणी भरून त्यात बसते थकल्यामुळे तिला तिथेच झोप लागते.

दहा पंधरा मिनिटांनी तिला जाग येते आणि ती टब बाहेर येऊन शॉवर घेते, अंग पुसते व टॉवेल गुंडाळून बाहेर येते. समोर तिला कुणी बसल्याचे भासते; ती थोडी पुढे येते बघते तर तिथे एक तरणा ताठा पुरुष सोफ्यावर बसलेला असतो.

ती घाबरते आणि किंचाळून, “तुम्ही कोण, इथे या रूममधे काय करताय? मुळात तुम्ही आत आलातच कसे? तुम्हाला घरात येण्याची परवानगी दिली कुणी?”, म्हणत ती भिंतीचा आडोसा घेते.

त्या भिंतीला लागून एक उंच मोठा असा फ्लॉवरपॉट ठेवलेला असतो. त्यातील लाईटीचा मंद असा प्रकाश बाहेर पडत असतो. तो प्रकाश थेट तिच्या चेहेऱ्यावर पडतो, तो तिला बघत तिच्या जवळ येतो.

“बघ माझ्या जवळ नको येऊ; मी जोरात ओरडेण”, ती घाबरत घाबरत बोलते.

ती खूप सुंदर दिसत असते तिचे निळे डोळे नितळ कांती ज्या वर लाईट पडल्याने ती आणखीनच चमकत असते. तिच्या ओल्या केसांनवरणं पाणी तिच्या चेहऱ्यावर आणि खांद्यांवरण ओघळून जातं, तो तिला तस एकटक बघत असतो.

“मी कोण तुला खरंच नाही माहीत कि नाटक करतेयस” तो तिला जवळ घेत.

“मी तुझा नावाचा नवरा” म्हणत तो तिला बेड वर नेतो त्या नादात तिचा टॉवेल खाली पडतो ती तशीच बेड वर त्याच्या सोबत पडते तो तिच्या वर येतो आणि तिच्या ओठांजवळ स्वतःचे ओठ नेत तिच्याकडे बघतो ती डोळे घट्ट बंद करून घेते; तिला भीती वाटत असते त्यामुळे तीचं अंग थरथरत असतं.

“हे सगळे मुलांना रिझवायचे प्रकार जुने झालेत काही तरी नवीन तरी कर. एक लक्षात ठेव तू काहीही कर पण मी तुझा नवरा कधीच होणार नाही मी तुला कधी जवळ घेणार नाही आपण जगासाठी नवरा बायको आहोत. या रूममध्ये तुझं नि माझं कुठलच नातं नाही. तू फक्त माझ्यासाठी माझ्या बाबांनी ‘सत्यजित सरदेसाईंनी’ केलेली डील आहेस. काही महिन्यात आपण दोघे वेगळे होऊ, सो आता या पुढे हे सर्व करण्याचा प्रयत्न देखील करू नकोस.” म्हणत तो तिच्या वरण उठतो आणि रूम बाहेर पडतो.

ती तशीच पडून असते काही मिनटं तिला स्वतःला सावरायला लागतात. तिला काहीच कळत नसतं. ती जशी-तशी स्वतःला सावरते आणि स्वतःच्या बॅगकडे जाते त्यात तिचा नाईट गाऊन असतो. ती तो घालते आणि गादी वर जाऊन पडते.

तिला काही कळत नसतं हे सगळं काय चाललयं. इथे त्याच्याघरी त्याचे बाबा घरातील इतर लोक तिच्या येण्याचा आनंद साजरा करत असतात आणि तो? तो आला आणि माझ्यावर इतका मोठा आरोप करून गेला. जे तिच्या ध्यानीमणी पण नसतं. ते तो बोलून जातो. त्याची वृत्ती आणि विचार दोन्ही फार भयानक आहेत. तिच्या मनात विचारांचा काहूर माजतो कुठलंच गणित सुटत नसतं. याच विचारात ती झोपते.

क्रमशः


ऋचा पिंपळसकर | Rucha Pimplaskar
पुणे, महाराष्ट्र (भारत) । सभासद, मराठीमाती डॉट कॉम
लेखनाची अत्यंत आवड असणाऱ्या ऋचा पिंपळसकर मुळात एक कम्युनिकेशन ट्रेनर म्हणुन कार्यरत आहेत यांची स्वतःची एक वेगळी लेखनशैली आहे.

२ टिप्पण्या

  1. पुढील भागात काय असेल याची उत्कंठा वाढत चालली आहे.

    छान लिहिलंय.
    1. पुढचा भाग उद्या प्रकाशित होत आहे.

      धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.