Loading ...
/* Dont copy */

जळगाव जिल्हा (महाराष्ट्र)

जळगाव जिल्हा - [Detailed Information and Photos of Jalgaon District] जळगाव जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.

जळगाव जिल्हा | Jalgaon District

पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा होय


जळगाव जिल्हा

‘मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी’ या शब्दात आचार्य अत्रे यांनी ज्यांचे वर्णन केले, त्या सानेगुरुजींच्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण याच जळगाव जिल्ह्यात झाली.

पूर्वी खानदेश नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा पूर्वभाग म्हणजे आजचा जळगाव जिल्हा होय. सखाराम महाराजांच्या समाधीमुळे व तत्त्वज्ञान मंदिरामुळे एक संतपीठ ठरलेले अमळनेर; पर्शियन भाषेतील शिलालेख व पांडववाडा यांमुळे ऐतिहासिक ठरलेले एरंडोल; यादवकालीन शिल्पांमुळे महत्त्व प्राप्त झालेले पाटण व कॉंग्रसच्या ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे (१९३६) आधुनिक भारताच्या इतिहासात नोंदले गेलेले फैजपूर ही गावे या जिल्ह्याची आभूषणे होत.

‘मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी’ या शब्दात आचार्य अत्रे यांनी ज्यांचे वर्णन केले, त्या सानेगुरुजींच्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण याच जिल्ह्यात झाली. येथेच त्यांचे कार्य-कर्तृत्व फुलले. बालकवी ठोंबरे, अहिराणी बोलीत रसाळ व प्रासादिक काव्यरचना करणाऱ्या ‘निसर्गकन्या’ बहिणाबाई चौधरी ह्या या मातीने महाराष्ट्राला दिलेल्या देणग्या होत.

मुख्य ठिकाण: जळगाव
तालुके: तेरा
क्षेत्रफळ: ११’७६५ चौ. कि. मी.
लोकसंक्या: ३१,८७,६३४


जळगाव जिल्ह्यातील भौगोलिक स्थान


महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरील जिल्हा. पूर्वेस बुलढाणा व मध्य प्रदेशातील पूर्व नेमाड जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येस नाशिक जिल्हा, पश्चिमेसस धुळे जिल्हा, तर उत्तरेस मध्य प्रदेश राज्यातील खरगोण व पूर्व नेमाड हे जिल्हे, असे स्थान जळगाव जिल्ह्यास लाभले आहे.

जळगाव जिल्ह्यातील तालुके

जळगाव जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत
 1. जळगाव
 2. चोपडा
 3. यावल
 4. रावेर
 5. एदलाबाद
 6. भुसावळ
 7. जामनेर
 8. पाचोरा
 9. चाळीसगाव
 10. भडगाव
 11. पारोळे
 12. एरंडोल
 13. अमळनेर

जळगाव जिल्ह्याची प्राकृतिक रचना


सातपुडा पर्वतरांगांचा प्रदेश; तापी खोऱ्याचा पठारी प्रदेश व अजिंठा, सातमाळा, चांदोर व हस्तीडोंगर यांचा कमी उंचीचा विस्कळित डोंगररांगांनी व्याप्त प्रदेश; असे जिल्ह्याचे तीन स्वाभाविक विभाग पडतात.

जिल्ह्याच्या उत्तरेकडील भाग सातपुडा पर्वतरांगांनी व्याप्त आहे. चोपडा, यावल व रावेर या तालुक्यातील उत्तर भाग या स्वाभाविक विभागात मोडतो.

सातपुडा पर्वतरांगाचा प्रदेश व सातमाळा-अंजिठ्याचा डोंगराळ प्रदेश वगळता जिल्ह्याचा उर्वरित भाग तापी खोऱ्याच्या सखल मैदानी प्रदेशात मोडतो.

जिल्ह्याच्या नैऋत्येस चांदोर व सातमाळाच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. तर दक्षिणेस व काहीसा आग्नेयेस अंजिठ्याच्या डोंगररांगा व घोडसगावचे डोंगर पसरलेले आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेस किंबहुना काहीशा ईशान्येस हस्ती डोंगररांगा वसलेल्या आहेत. या सर्व कमी उंचीच्या, विस्कळीत व विखुरलेल्या डोंगररांगांचा एक स्वाभाविक विभाग मानला गेला आहे. सातमाळाचे व चांदोरचे डोंगर चाळीसगाव तालुक्यात पसरलेले आहेत, तर अजिंठ्याचे डोंगर जामनेर तालुक्यात पसरलेले आहेत. घोडसगावच्या डोंगररांगा भुसावळ तालुक्यात, तर हस्तीचे डोंगर एदलाबाद तालुक्यात विखुरलेले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मृदा


सातपुड्याच्या उतारावर व दक्षिणेकडील डोंगररांगाजवळ वाळूमिश्रित मृदा आढळते. भडगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ व एदलाबाद या तालुक्यांमधील काही भागात तसेच चोपडे, यावल व रावेर या तालुक्यांच्या उत्तरेकडील काही भागात अशी मृदा आढळते. एरंडोल , अमळनेर, जळगाव व भुसावळ या तालुक्यांमध्ये गाळाची काळी कसदार मृदा आढळते. रावेर, यावल व चोपडा या तालुक्यांच्या काही भागातील मृदा वनाच्छादित आहे.

जळगाव जिल्ह्याचे हवामान


सर्वसाधारणपणे जिल्ह्यातील हवामन कोरडे व विषम असून ते आरोग्यदायी आहे. उन्हाळे अतिशय कडक असून हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी असते. डिसेंबर महिना सर्वाधिक थंडीचा, तर एप्रिल महिना सर्वाधिक तापमानाचा असतो. जळगाव येथे डिसेंबरमध्ये १० डिग्री से. इतके कमी तापमान असते, तर एप्रिलमध्ये तापमान ४२ डिग्री से. च्या पुढे जाते.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी ७४ सें. मी. इतकी आहे. तापी खोऱ्यात ७६ ते ८१ से. मी. च्या दरम्यान पाऊस पडतो. जामनेर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो, तर जिल्ह्यातील सर्वांत कमी पावसाची नोंद अमळनेर तालुक्यात होते. जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण एकंदरीत कमी असले, तरी हा पाऊस बराचसा निश्चित व नियमित स्वरूपाचा असून या पावसाचे वितरण फारसे असमान नाही.

एदलाबाद, अमळनेर, चाळीसगाव, पारोळे व पाचोरा या तालुक्यांमध्ये १९७४-७५ पासून तर जळगाव व जामनेर या तालुक्यांमध्ये १९९४-९५ पासून अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील नद्या


तापी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी. मध्य प्रदेश राज्यात उगम पावणारी ही नदी धुळे जिल्हा ओलांडून जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. जिल्ह्यातील हिचा प्रवास जिल्ह्याच्या उत्तर-मध्य भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे असा होतो. या पश्चिमवाहिनी नदीचे पात्र खोल आहे. पूर्णा व पांझरा या तापीच्या दक्षिणेकडील उपनद्या असून भोकर, सूकी, मोर, गुळी, हडकी व अनेर या तापीच्या उत्तरेकडील उपनद्या होत. एदलाबाद तालुक्यात ‘चांगदेव’ येथे तापी व पूर्णा यांचा संगम झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील धरणे


भुसावळ तालुक्यातील हातनूर येथे अप्पर तापी प्रकल्पांतर्गत बांधण्यात आले आहे. गिरणा नदीवर दहिगाव व जामदे येथे बांधण्यात आलेली धरणे महत्त्वाची आहेत. बोरी नदीवर तामसवाडी येथे, सुकी नदीवर गारबर्डी येथे व अनेर नदीवर मणपूर येथे धरणे आहेत. पाटोळे तालुक्यात म्हसवे येथे व एदलाबाद तालुक्यात हरताळे व वेल्हाळे येथे मोठे तलाव आहेत. नाशिक जिल्ह्यातील पांझण येथील गिरणा प्रकल्पाचा लाभही जळगाव जिल्ह्यास होतो.

जळगाव शहरास गिरणा नदीचे तर भुसावळ शहरास तापी नदीचे पाणी पुरविले जाते.

जळगाव जिल्ह्यातील पिके


जळगाव जिल्ह्यात ज्वारी, कापूस, बाजरी, भुईमूग व डाळवर्गीय पिके खरीप हंगामात तर गहू, हरभरा व ज्वारी ही पिके रबी हंगामात घेतली जातात. ज्वारीचे पिक दोन्ही हंगामात घेतले जाते. रबी ज्वारीला जिल्ह्यात ‘दादर’ असे संबोधले जाते.

जळगाव जिल्ह्यातील अन्नधान्य पिकांमध्ये ज्वारी हे सर्वांत महत्त्वाचे पिक होय. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रांपैकी निम्याहून अधिक क्षेत्र ज्वारीच्या पिकाखाली आहे. ज्वारी जिल्ह्यात सर्वत्रच पिकविली जात असली तरी जामनेर, एरंडोल, चाळीसगाव, भुसावळ व यावल हे तालुके खरीप ज्वारीच्या दृष्टीने तर अमळनेर, चोपडा, जळगाव, पाचोरे व एरंडोल हे तालुके रबी ज्वारीच्या दृष्टीने महत्त्वाचे होत. बाजरी हे जिल्ह्यातील दुसरे महत्त्वाचे अन्नधान्य पीक होय. चाळीसगाव तालुका बाजरीच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा मानला जातो.

तेलबियांच्या उत्पादनात जिल्हा अग्रेसर आहे. चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल व पारोळे या तालुक्यांमध्ये भुईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रांपैकी सोळा टक्क्यांहून अधिक क्षेत्र भुईमुगाखाली आहे.

कापूस हे जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचे व्यापारी पीक होय. जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेत कापसाच्या उत्पादनास अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रापैकी एकपंचामांश क्षेत्र कापसाखाली आहे. जामनेर, चोपडे, एरंडोल, पाचोरे, भुसावळ हे तालुके कापसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहेत. भारतात इतरत्र कोठेही न होणारे भारतीय केळ्यांचे उत्पादन एकट्या जळगाव जिल्ह्यात घेतले जाते. जळगाव जिल्ह्यातील केळी प्रसिद्ध असून जळगाव जिल्ह्याला केळ्याचे आगर म्हणून ओळखले जाते. राज्यातील केळ्याखाली असलेल्या क्षेत्रापैकी तीनचतुर्थांश क्षेत्र जळगाव जिल्ह्यात आहे. रावेर व यावल हे तालुके केळ्यांच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

जळगाव जिल्ह्यातील वने


जळगाव जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त १५ टक्के क्षेत्रावर वने आहेत. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांच्या प्रदेशात बऱ्यापैकी वने आढळतात. चोपडा, यावल व रावेर या तालुक्यात वने अधिक आहेत. येथील वनांमध्ये साग, तिवस, धावडा, सालई, ऐन, पळस, खैर, बाभूळ , हलदु, अंजन आदी वृक्ष आढळतात. रोशा जातीचे गवत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. जिल्ह्यात यावल येथे अभयारण्य असून पाल येथे वनोद्यान आहे. यावलच्या अभयारण्यात नीलगाई व हरणे आढळतात.

जळगाव जिल्ह्यातील उद्योगधंदे


अलीकडील काळात जळगाव जिल्हा औद्योगिकदृष्ट्या विकसित होऊ लागला आहे. भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे युद्धसाहित्य निर्मितीचा मोठा कारखाना असून भुसावळजवळच फेकरी येथे औष्णिक विद्युतनिर्मिती केंद्र आहे. पाचोरे व अमळनेर येथे वनस्पती तेल, वनस्पती तूप व साबण निर्मितीचे कारखाने आहेत. पाचोरे तालुक्यातील नगरदेवळे येथे व भुसावळ तालुक्यातील खडके येथे सूत गिरण्या आहेत. चाळीसगाव व अमळनेर येथे कापड गिरण्या आहेत. जळगाव तालुक्यातच पिंप्राळे येथे कृत्रिम रेशमी कापडाची गिरणी आहे. भुसावळजवळ कागदाची गिरणी असून एरंडोल येथे हातकागद निर्मितीचा व्यवसाय चालतो.

जळगाव येथे दुधाची भुकटी तयार करण्याचा कारखाना असून सहकारी साखर कारखाना; यावल तालुक्यात फैजपूरजवळ मधुकर सहकारी साखर कारखाना; एदलाबाद तालुक्यात एदलाबाद जवळ श्रीसंत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना; चोपडा तालुक्यात चोपड्याजवळ चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना; जामनेर तालुक्यात गोंडाखेल येथे जामनेर तालुका सहकारी साखर कारखाना; चाळिसगाव तालुक्यात बेलगंगानगर (भोरस) येथे बेलगंगा सहकारी साखर कारखाना हे सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने जिल्ह्यात कार्यरत आहेत.


चाळिसगावच्या उत्तरेस सुमारे ३० कि.मी. अंतरावर गिरणा नदीकाठी वसलेले ‘बहाळ’ हे गाव ताम्र-पाषाणयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.

जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे


जळगाव: जळगाव जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. गिरणा-तापी दुआबामध्ये वसलेले हे व्यापारी शहर कापसाची मोठी बाजारपेठ आहे. जळगाव-अजिंठा राजमार्ग जळगावमधून सुरू होतो. या शहरास अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. शहरात आकाशवाणी केंद्र, दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र व विमानतळ आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मुख्य ठिकाण म्हणून जळगाव प्रसिद्ध आहे. अलीकडील काळात औद्योगिकदृष्ट्याही शहरास महत्त्व प्राप्त होत असून येथे एक औद्योगिक वसाहतही स्थापन झाली आहे.

भुसावळ: भुसावळ तालुक्याचे मुख्य ठिकाण. महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. येथे दूरदर्शन सहप्रक्षेपण केंद्र आहे. जवळच फेकरी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.

चांगदेव: एदलाबाद तालुक्यात. येथे तापी व पूर्णा नद्यांचा संगम झाला आहे.

अमळनेर: अमळनेर तालुक्याचे मुख्य ठिकाण. भुसावळ-सुरत लोहमार्गावरील महत्त्वाचे स्थानक. वनस्पती तुपाचा कारखाना व कापड गिरणी. येथे बोरी नदीकाठी सखाराम महाराजांची समाधी आहे. साने गुरुजींनी काही काळ येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले आहे.

चाळिसगाव: चाळीसगाव तालुक्याचे मुख्य ठिकाण. महत्त्वाचे रेल्वे जंक्शन. जवळच पाटणादेवी येथे देवीचे मंदिर आहे. तेथेच प्राचीन भारतीय गणिती भास्कराचार्य यांनी आपला ‘लीलावती’ हा ग्रंथ लिहिला, असे म्हटले जाते.

पाल: रावेर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेले थंड हवेचे ठिकाण. येथील वनोद्यानही पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे.

जामनेर: पाचोरा-जामनेर लोहमार्गावरील शेवटचे स्थानक. जामनेर तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथे वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना आहे.

उत्राण: एरंडोल तालुक्यातील हे ठिकाण तेथील उत्कृष्ट प्रतीच्या लिंबासाठी प्रसिद्ध आहे. येथे लिंबाचा रस काचेच्या बाटल्यांमध्ये भरण्याचा कारखाना असून उत्राणची लोणची प्रसिद्ध आहेत.

फैजपूर: यावल तालुक्यात. येथे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन १९३६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.

याशिवाय पारोळे (तालुक्याचे मुख्य ठिकाण व प्राचीन किल्ला.); एरंडोल (तालुक्याचे मुख्य ठिकाण. पर्शियन भाषेतील शिलालेख व पांडववाडा.); यावल (तालुक्याचे मुख्य ठिकाण व अभायरण्य.); भडगाव (गिरणा नदीकाठी. तालुक्याचे प्रमुख ठिकाण.); उपनदेव-सुपनदेव व नाझरदेव (चोपडे तालुक्यात. गरम पाण्याचे झरे.); चोपडे (तालुक्याचे मुख्य ठिकाण. बैलगाड्या बनविण्याचा उद्योग.); धरणगाव (एरंडोल तालुक्यात. हातमाग व यंत्रमाग उद्योग.); ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.

जळगाव जिल्ह्यातील वाहतुक


धुळे - कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जळगावमार्गे जिल्ह्यातून जातो. या मार्गावर जळगावव्यतिरिक्त पारोळे, एरंडोल, भुसावळ व एदलाबाद ही ठिकाणे आहेत. याशिवाय मुंबई-चाळिसगाव, जळगाव-अजिंठा व रायसिंग-बऱ्हाणपूर हे राज्य मार्ग जिल्ह्यातून जातात.

मध्य रेल्वेचे मुंबई-दिल्ली व मुंबई-कलकत्ता हे लोहमार्ग जळगाव, भुसावळमार्गे जिल्ह्यातून जातात. चाळीसगाव, पाचोरे, वरणगाव, जळगाव, भुसावळ, बोदवडा ही मुंबई कलकत्ता लोहमार्गावरील राज्यातील शेवटचे जंक्शन होय.

भुसावळहून एक लोहमार्ग गुजरातमधील सुरतपर्यंत जातो. या मार्गावर जळगाव, धरणगाव व अमळनेर ही जिल्ह्यातील स्थानके आहेत.

जिल्ह्याच्या नैऋत्य भागात चाळीसगाव-धुळे हा लोहमार्ग असून जळगाव तालुक्यातील जामदा हे या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाचोरे-जामनेर हा लोहमार्ग आहे. पाचोरे येथून सुरू होणारा हा लोहमार्ग वरखेडी, शेंदूर्णी, पहूरमार्गे जामनेरला जातो.

चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, पाचोरे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे जंक्शन्स होत.


भिल्ल, पावरा, तडवी, पारधी, गोमीत, गोंड यांसारख्या आदिवासी जमाती जिल्ह्यात आहेत. चोपडे, यावल व रावेर या तालुक्यांमध्ये त्यांची वस्ती आहे.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,15,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1114,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,1,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,874,आईच्या कविता,21,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,4,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,23,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,46,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,61,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,10,गोड पदार्थ,56,गौतम जगताप,1,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,424,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,71,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,56,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,9,निवडक,4,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,14,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,90,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,8,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,101,मराठी कविता,743,मराठी गझल,24,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,14,मराठी टिव्ही,42,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,15,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,41,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,158,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश बिऱ्हाडे,4,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,87,मातीतले कोहिनूर,17,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,21,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,8,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,55,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,6,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,10,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,30,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,131,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,21,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सीमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,18,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: जळगाव जिल्हा (महाराष्ट्र)
जळगाव जिल्हा (महाराष्ट्र)
जळगाव जिल्हा - [Detailed Information and Photos of Jalgaon District] जळगाव जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-6qCj0Ej7Eb5i02IhVshRxXQ54hd6f1LfLOcRv5uEfj141VJorFsjFImfdlpYEPvzF1OHoQYBjbgifG7k26fNOOWpz_vcOV9RkQ4Xl0lt6WcnU0aOf53ka3EIHyvPTQ_ECzpvHBOByO6TdswgGYu8tn752r2V3YKgPA651u41ZDjXUh6EilWVQPOaCw/s1600-rw/jalgaon-district.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-6qCj0Ej7Eb5i02IhVshRxXQ54hd6f1LfLOcRv5uEfj141VJorFsjFImfdlpYEPvzF1OHoQYBjbgifG7k26fNOOWpz_vcOV9RkQ4Xl0lt6WcnU0aOf53ka3EIHyvPTQ_ECzpvHBOByO6TdswgGYu8tn752r2V3YKgPA651u41ZDjXUh6EilWVQPOaCw/s72-c-rw/jalgaon-district.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/09/jalgaon-district.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/09/jalgaon-district.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची