निमगाव दावडी खंडोबा

निमगाव दावडी खंडोबा - [Nimgaon Dawadi Khandoba] पुणे जिल्ह्यातील निमगावचे दावडी खंडोबा देवस्थान.
निमगाव दावडी खंडोबा | Nimgaon Dawadi Khandoba

पुणे जिल्ह्यातील निमगावचे दावडी खंडोबा देवस्थान

पुणे जिल्ह्यातील निमगावच्या दावडी खंडोबा देवस्थानाचे बांधकाम हे हेमाडपंथी असून खंडोबा परिसरात २५ प्रशस्त दगडी कमानी आहेत. निमगाव दावडी खंडोबाच्या ठिकाणी मार्गशीर्ष शु. प्रतिप्रदा ते चंपाषष्ठी पर्यंत नवरात्र उत्सव असतो व फार मोठी यात्रा भरते.

निमगाव दावडी खंडोबा मंदिरामध्ये देवास पाणी घालण्यासाठी जवळच असणाऱ्या भीमा नदीचे पाणी आणले जाते. खंडोबाला दही-भाताची पूजा बांधली जाते व तो दही-भात भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटला जातो. निमगाव दावडी खंडोबाच्या यात्रेमध्ये कुस्त्यांचे सामने आणि बैलगाडी शर्यत मोठ्या प्रमाणामध्ये भरविल्या जातात.

निमगाव दावडी खंडोबा येथे जाण्याचा मार्ग


पुणे जिल्ह्यातील तालुका खेड मधील राजगुरुनगर पासून निमगाव दावडी खंडोबा देवस्थान हे १० किलोमीटरवर आहे.


निमगाव दावडी खंडोबा
मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरिल विविध विभागांत लेखन आणि संपादन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.