नवीन समाजाची नवी राखी

नवीन समाजाची नवी राखी, कार्यक्रम - [Navin Samajachi Navin Rakhi, Events].
नवीन समाजाची नवी राखी - कार्यक्रम | Navin Samajachi Navin Rakhi - Events

साई संस्थेच्या प्रेमळ धाग्यांमध्ये दडलेला अतूट विश्वास

भारतामधील खूप महत्वाचा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’. धाग्याच्या दोरीमध्ये दडलेला विश्वास राखी स्वरुपात बहीण भावाला बांधते. ‘रक्षाबंधन’ या दोन शब्दांमध्ये आयुष्यभराची काळजी आणि सुरक्षा लपलेली असते. पण काळाच्या ओघामध्ये ही काळजी बहिणीच्या सुरक्षेची जबाबदारी कुठे तरी कमी कमी झालेली भासते. नाती ही फक्त रक्ताची नसतात तर ती मनाने जोडली जातात. आपल्या समाजातील काही बहिणी या सणापासून दूर आहेत ‘बहिण’ म्हणून देखील त्यांचा विचार केला जात नाही.

समाजातील अशा महिलांपैकी एक म्हणजे देहविक्रय करणाऱ्या महिला. या महिलांसाठी सोशल ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात ‘साई’ ह्या संस्थेने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. २५ ऑगस्ट २०१८ रोजी कामाठीपुरा येथील ११वी गल्ली, शितलादेवी मंदिरा समोर दुपारी १२.३० वाजता हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात येण्यात आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी देहविक्रय करणाऱ्या महिलांना बंधू म्हणून झांगडगुत्ता या मराठी चित्रपटातील कलावांत म्हणजेच भारत गणेशपुरे आणि सागर करंडे लाभणार आहेत. या कार्यक्रमाच्या वेळी देहविक्रय करणाऱ्या महिलांना बंधू म्हणून झांगडगुत्ता या मराठी चित्रपटातील कलावांत म्हणजेच संजय खापरे, भारत गणेशपुरे, संजय कुलकर्णी, जयवंत वाडकर, विजय कदम, अंशुमाला पाटील आणि चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप नवरे आणि बॉलीवूड अभिनेते जे. ब्रॅन्डन हिल साईचे सदिच्छादूत लाभणार आहेत.

‘साई’ (सोशल ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन) ही संस्था देहविक्रय करणाऱ्या महिलांचा उत्कर्ष व पुनर्वसनाचे कार्य करते. समाजानेच तयार केलेला आणि वंचित ठेवलेला हा घटक. या महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साई संस्था नेहमीच प्रयत्नशील असते.

१९९१ पासून हा उपक्रम साई संस्था राबवित आहे. यापैकी एक उपक्रम म्हणजे ‘रक्षाबंधन’. समाजातील प्रतिष्ठित आणि प्रभावशील व्यक्तीला या दिवशी बंधू म्हणून निमंत्रित केले जाते. या वंचित भगिनी आपल्या या बंधूला औक्षण करुन राखी बांधतात, असे या कार्यक्रमाचे स्वरुप असते. हे संस्थेचे संस्थापक विनय वस्त यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्क
मृणाल पाटील: ७०३९८३८०४६
नेहा प्रभू : ८२८६१२२४०४

1 टिप्पणी

  1. साई संस्थेला खूप खूप शुभेच्छा!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.