स्टार प्रवाहच्या छत्रीवाली या मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने कीर्तन सोहळा रंगणार आहे
आज आषाढी एकादशी. विठूनामाच्या जयघोषात अवघा महाराष्ट्र दंग झाला आहे. वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. ठिकठिकाणी कीर्तन सोहळे होत आहेत.प्रत्येकालाच आस आहे ती विठुरायाच्या दर्शनाची. त्याचंच प्रतिबिंब स्टार प्रवाहच्या ‘छत्रीवाली’ मालिकेतही पहायला मिळणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मालिकेत कीर्तनाचा कार्यक्रम रंगणार आहे.
मधुराच्या चाळीत दरवर्षी कीर्तन सोहळा होतो. यंदा मात्र मधुराच्या घरी कीर्तन होणार आहे. सगळे चाळकरी मधुराच्या घरी जमणार आहेत. विक्रांतही या कार्यक्रमासाठी मधुराच्या घरी येणार आहे.
कीर्तनाच्या या खास कार्यक्रमाची धुरा दरवर्षी मधुराच्या खांद्यावर असते. यंदामात्र ही सगळी जबाबदारी मधुराची बहिण आकांक्षाने घेतलीय.
आकांक्षा तिची ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडते का? चाळकरी कीर्तनात कसे दंग होणार, विक्रांत या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होणार का? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर छत्रीवालीच्या येत्या काही एपिसोड्समध्ये पाहायला मिळणार आहेत.
![]() |
स्टार प्रवाहच्या छत्रीवाली या मालिकेतील एक दृष्य |