अशी ती एक - मराठी कविता

अशी ती एक, मराठी कविता - [Ashi Tee Ek, Marathi Kavita] कोणालाही आपलसं करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी, पण कधी तीने कोणाशी आपल्या भावना व्यक्तच केल्या नाही.
अशी ती एक - मराठी कविता | Ashi Tee Ek - Marathi Kavita
कोणालाही आपलसं करणारी, सर्वांना हवीहवीशी वाटणारी
पण कधी तीने कोणाशी आपल्या भावना व्यक्तच केल्या नाही

पण सर्वांसाठी एक गुप्त डायरी होती
अशी ती एक

कधी कोणी कोणत्याही गोष्टीसाठी तीची मदत मागावी आणि
कधी कोणाला नाही न म्हणणारी
अशी ती एक

पण एक वेळ अशी आली की तीला काही तरी कोणाला
सांगायचे होते पण सांगू शकली नाही
अशी ती एक

कधी तिला कुणाची गरज आहे आणि कुणी येऊन तिला विचारेल की काय झालं गं ?
पण तीला सांगता नं येणे
अशी ती एक

एक दिवशी आला एक राजकुमार तिच्या आयुष्यात
जो तिला हवा हवा सा वाटणारा ज्यावर तिने जिव लावला

आणि नकळत त्याला आपल्या भावना, अलगदपणे जशी कळी खुलावी
अशी त्याच्याबरोबर खुलत गेली
अशी ती एक
विद्या कुडवे | Vidya Kudave
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता, मराठी लेख या आणि अशा विविध विभागांत लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.