बसुनी दारात विचार - मराठी कविता

बसुनी दारात विचार, मराठी कविता - [Basuni Darat Vichar, Marathi Kavita] बसुनी दारात विचार, केला बघुनी मी आभाळी.
बसुनी दारात विचार - मराठी कविता | Basuni Darat Vichar - Marathi Kavita
बसुनी दारात विचार
केला बघुनी मी आभाळी
सुख पसरे शुभ्र आकाशी
ढग दुःख प्रतिमा काळी

भिरभिरती ह्या चिमण्याही
घेऊन आनंद उराशी
जीव लपवी क्षणी झाडात
संकट चाहुल जराशी

जगतो आपणही असेच
घेऊन यातना पोटी
कळ हृदयी येते तेव्हा
हाक देता थांबते ओठी

का बंधने ही लागावी
मनी मानव घ्या निष्पाप
वेळासे परतती पाऊल
पोरके होई जनहात

मन होई उदास निराश
परि बेवारस हे भटकते
मृगजळा ही दिसावे यास
क्षणभंगुर त्यात अडकते

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.