मी नाव शोधतो आहे - मराठी कविता

मी नाव शोधतो आहे, मराठी कविता - [Mi Naav Shodhato Aahe, Marathi Kavita] मी नाव शोधतो आहे, मी नाव शोधतो आहे, संथ प्रवाही नदीचा मी ठाव शोधतो आहे.
मी नाव शोधतो आहे - मराठी कविता | Mi Naav Shodhato Aahe - Marathi Kavita
मी नाव शोधतो आहे, मी नाव शोधतो आहे
संथ प्रवाही नदीचा मी ठाव शोधतो आहे

पहाटेचे धुके पिऊनी
कैकदा कैफात चाललो
हातांनी स्पर्शून पाणी
कधी दवात थोडा भिजलो

मी मनात गुणगुणणारे ते भाव शोधतो आहे
संथ प्रवाही नदीचा मी ठाव शोधतो आहे

मुसाफिर गावा चाललो
हलकेव व्हल्हे फिरले
नदीचे निर्मळ पाणी
आपसूक बाजूस वळले

नावेचे आठव स्मरूनी उरी घाव पेलतो आहे
संथ प्रवाही नदीचा मी ठाव शोधतो आहे

वाटले न तेव्हा कधीही
हे चित्र पालटे होईल
नावेचे नाव पुसुनी
मज गाव पोरका होईल

हिरमुसुनी मी नियतीचा हा डाव पाहतो आहे
संथ प्रवाही नदीचा मी ठाव शोधतो आहे


उमेश कुंभार | Umesh Kumbhar
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता आणि मराठी गझल या विभागात लेखन.

1 टिप्पणी

  1. छान आहे ब्लॉक तुमचा
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.