बैल आणि बोकड - इसापनीती कथा

बैल आणि बोकड - इसापनीती कथा - [Bail Aani Bokad - Isapniti Katha] संकटात सापडलेल्यास यथाशक्ती साह्य न करणे हे मनुष्यपणास योग्य नाही, मग साह्य न करता उलट त्याचा धिक्कार करून त्यास त्रास देणे, यासारखा दुष्टपणा दुसरा काय आहे.
बैल आणि बोकड - इसापनीती कथा | Bail Aani Bokad - Isapniti Katha
सिंह मागे लागला म्हणून एक बैल जीव घेऊन पळाला तो एका गुहेत शिरत असता, तेथे एक बोकड होता, तो त्यास आत येऊ देईना.

तो म्हणाला, ‘हे माझे घर आहे, यात तू आलास तर मी तुला मारीन !’ बैलाने फार विनवणी करून त्यास म्हटले, ‘अरे, माझ्या पाठीस सिंह लागला आहे, यावेळी मला आश्चय दयावा, हे तुझ्या गृहस्थपणास योग्य आहे.’ बकरा ते काही ऐकेना; तो शिंगे उभारून त्याच्या अंगावर धावू लागला.

तेव्हा बैल त्यास म्हणतो, ‘अरे, मी तुला अथवा तुझ्या शिंगाला भीत नाही. परंतु, काय करू, मी संकटात सापडलो आहे. जर का या वेळी माझ्या मागे सिंह नसता, तर बैलाच्या आणि बोकडाच्या योग्यतेमध्ये किती अंतर आहे, याचा चमत्कार आताच दाखविला असता.’

तात्पर्य: संकटात सापडलेल्यास यथाशक्ती साह्य न करणे हे मनुष्यपणास योग्य नाही, मग साह्य न करता उलट त्याचा धिक्कार करून त्यास त्रास देणे, यासारखा दुष्टपणा दुसरा काय आहे ?
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.