Loading ...

बेडूक आणि मधमाशी - इसापनीती कथा

बेडूक आणि मधमाशी, इसापनीती कथा - [Beduk Aani Madhmashi, Isapniti Katha] खरा मोठेपणा अंगच्या गुणावर अवलंबून असतो.

बेडूक आणि मधमाशी - इसापनीती कथा | Beduk Aani Madhmashi - Isapniti Katha
एके वेळी काही कामकरी दगडांच्या खाणीत काम करीत असता त्यांनी खडकाचा अर्धा भाग फोडीला इतक्यात त्या खडकाच्या पोटातून चटकन एक मोठा बेडूक उडी मारून बाहेर आला.

हे पाहून मजुरांस फार आश्चर्य वाटले व ते त्याजकडे कौतुकाने पाहत उभे राहिले.

तो बेडूक त्या खडकाच्या पोटात जन्मला कसा, जगला कसा व वाढला कसा, यासंबंधी ते कामकरी आपसात बोलू लागले. त्यांची भाषणे कानी पडताच त्या बेडकालाही स्वतःबद्दल मोठी धन्यता व गर्व वाटून तो म्हणाला, “दादांनो, मागचा प्रलय होऊन गेल्यावर जेव्हा भगवंताने पिंपळाच्या पानावर जन्म घेतला, तेव्हाच मीही जन्मलो. माझ्या बरोबरीचा म्हणवू शकेल, असा एकही प्राणी या जगात नाही. भगवंताचे आणि माझे कूळ एकच आणि मीही त्याच्यासारखाच पुढच्या प्रलयापर्यंत जगणार!” तो बोलत आहे इतक्यात एक मधमाशी तेथे येऊन म्हणाली, “बेडूकदादा, तू पुष्कळ काळ जगलास आणि तुझा जन्म मोठया कुळात झाला असला तरी तुला यात गर्व वाहण्यासारखे काय आहे? आपल्या लांबलचक आयुष्याने कोणाचा काय फायदा होणार आहे.

तीच माझी गोष्ट पहा बरे! माझे आयुष्य मोठे नाही तथापि मी सदोदित उदयोग करते व लोकांच्या उपयोगी पडते. नानाप्रकारच्या सुंदर फुलझाडांचा मला उपभोग मिळतो व सर्वांनी कित्ता घेण्याजोगे माझे वर्तन असते.

मोठया कुळात जन्मून हजारो वर्षे जगले; परंतु सारे आयुष्य आळसात व अज्ञासात घालविले तर त्याच्या काय उपयोग?”

तात्पर्य: खरा मोठेपणा अंगच्या गुणावर अवलंबून असतो.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची