खरंच आपण अज्ञानी असतो (मराठी कविता)

खरंच आपण अज्ञानी असतो, मराठी कविता - [Aapan Adnyani Asato, Marathi Kavita] खरंच का नवऱ्यांना, सौंदर्याची जाण असते.
खरंच आपण अज्ञानी असतो - मराठी कविता | Aapan Adnyani Asato - Marathi Kavita
खरंच आपण अज्ञानी असतो (मराठी कविता), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.

खरंच का नवऱ्यांना सौंदर्याची जाण असते? जिचे सौंदर्य ते पारखतात ती खरंच का अज्ञानी असते? एकीचा नवरा चाहता नाजूक साजूक बाहुलीचा बालिश अल्लड प्रेमाचा अन्‌ नखरेल कोवळ्या कळीचा एकीचा नवरा चाहता उंच बांध्याच्या बाईचा बांधेसूद हाडांचा अन्‌ घाटदार वळणाचा एकीचा नवरा चाहता शांत समंजस स्वभावाचा किती ही ओरडा खाल्ला तरी सावित्री बनण्याचा एकीचा नवरा चाहता गोऱ्यापान रंगाचा सुंदर टपोरे डोळे अन्‌ चेहरा हवा मस्तानीचा एकीचा नवरा चाहता धाडशी ललनेचा आळस नको कामाचा विचार फक्त घराचा मग... उगाच बिचाऱ्या बायका जीम मध्ये धावतात पोट सपाट करताना मन मात्र मारतात कित्येक बिचाऱ्या ललना पार्लरच्या वाऱ्या करतात गोऱ्या रंगासाठी भोळ्या पैसे खर्च करतात बर्‍याच बिचाऱ्या निराश कुचंबना सहन करतात सावित्री बनण्याच्या नादात डिप्रेस होऊन जातात जो सर्वाचा कर्ता धरता खरंच का बांधेसूद असतो? गोऱ्यापान रंगाचा अन्‌ सत्यवाना सारखा वागतो? त्याचीच आवड जपण्यापेक्षा स्वत्व जपायला शिकावे गर्वामध्ये वाहु नये पण आनंदाने जगावे सोडून मत्सर सर्‍याजणी एकच विचार करू संसार टिकविण्यासाठी मात्र जिंकू किंवा मरू साऱ्याच असतात सुंदर साऱ्याच असतात प्रेमळ द्वेष सोडून होऊन जाऊ पवित्र गंगाजळ बनू नये फक्त त्याच्याच कल्पनेतली आकृती तो आहे पुरुष तर आपण आहोत प्रकृती

- साक्षी खडकीकर.

२ टिप्पण्या

  1. अप्रतिम... अंतर्मनाची वास्तवता...
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.