Loading ...
/* Dont copy */

जन पळभर म्हणतील - मराठी कविता (भा. रा. तांबे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांची जन पळभर म्हणतील ही लोकप्रिय मराठी कविता.

जन पळभर म्हणतील - मराठी कविता (भा. रा. तांबे)

जन पळभर म्हणतील हाय हाय


जन पळभर म्हणतील - मराठी कविता (भा. रा. तांबे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांची जन पळभर म्हणतील ही लोकप्रिय मराठी कविता.



जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिल कार्य काय

सूर्य तळपतील, चंद्र झळकतील
तारे आपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील
होईल काही का अंतराय

मेघ वर्षतील, शेते पिकतील
गर्वाने या नद्या वाहतील
कुणा काळजी की न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय

सखेसोयरे डोळे पुसतील
पुन्हा आपुल्या कामी लागतील
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय

रामकृष्णही आले, गेले
त्याविण जग का ओसची पडले
कुणी सदोदित सूतक धरिले
मग काय अटकले मज शिवाय

अशा जगास्तव काय कुढावे
मोहि कुणाच्या का गुंतावे
हरिदूता का विन्मुख व्हावे
का जिरवु नये शांतीत काय

- भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची