Loading ...

छत्रीवाली मालिकेचं धमाल शीर्षकगीत - मराठी टिव्ही

छत्रीवाली मालिकेचं धमाल शीर्षकगीत, मराठी टिव्ही - [Love-Hate Relationship Title Song Chatriwali, Marathi TV] स्टार प्रवाहवरील छत्रीवाली या मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकवर्गातून भरभरुन दाद मिळताना दिसतेय.

छत्रीवाली मालिकेचं धमाल शीर्षकगीत - मराठी टिव्ही | Love-Hate Relationship Title Song Chatriwali - Marathi TV

लव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं छत्रीवाली मालिकेचं धमाल शीर्षकगीत

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकवर्गातून भरभरुन दाद मिळताना दिसतेय. अश्विनी शेंडे-बगवाडकरच्या लेखणीतून हे शीर्षकगीत तयार झालं असून नीलेश मोहरीरने हे गाणं संगीतबद्ध केलंय. टिकोजीराव ऐदी... आड येते ही छत्रीवाली असे धमाल शब्द असलेल्या या गाण्याला तरुणाईकडून पसंती मिळताना दिसतेय.

स्टार प्रवाहची शीर्षकगीतं नेहमीच खास असतात. अग्निहोत्र, पुढचं पाऊल, गोठ, नकुशी, नकळत सारे घडले, ललित २०५, विठुमाऊली अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. या मालिकांची श्रवणीय आणि अर्थपूर्ण असलेली गाणी आजवर हिट झाली आहेत. या यादीत आता ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या टायटल साँगचीही भर पडली आहे. नायक आणि नायिकेतल्या लव्ह-हेट नात्याचं नेमकेपणानं वर्णन आणि चित्रण या गाण्यातून करण्यात आलं आहे.

या गाण्याविषयी सांगताना नीलेश मोहरीर म्हणाला, 'मालिकेच्या नावातच खूप गंमत आहे. बरेचदा मालिकेच्या नावात गाण्याचा पदर दडलेला असतो. अश्विनी शेंडे-बगवाडकरने खूप उत्तम पद्धतीनं हे टायटल साँग लिहिलं आहे. तसंच बेला शेंडे आणि जयदीप बगवाडकरनंही तितक्याच हलक्याफुलक्या पद्धतीनं ते गायलंय. या गाण्यातून नायक-नायिकेचा स्वभाव, व्यक्तिरेखा नेमकेपणाने व्यक्त होते. माझ्या आजपर्यंतच्या गाण्यांमधलं हे टायटल साँग खूपच वेगळं आहे.

तेव्हा पाहायला विसरु नका छत्रीवाली सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची