आज इथे पावलोपावली माणसांमाणसातही फूट आहे माणसात माणसांची लूट आहे आज इथे पावलोपावली माणसाला मरण जपावं लागतं कुणासाठी कुणालातरी खपावं लागतं आज इथे पावलोपावली कुणी कुणाला बुडवतो आहे कुणी कुणाला रडवतो आहे आज इथे पावलोपावली जो ज्याला घडवतो आहे तोच त्याला बडवतो आहे धोंडोपंत मानवतकर सभासद, मराठीमाती डॉट कॉम<i class="fa fa-globe"></i><i class="fa fa-youtube-play"></i><i class="fa fa-facebook"></i><i class="fa fa-instagram"></i><i class="fa fa-twitter"></i><i class="fa fa-pinterest"></i> मराठी कविता या विभागात लेखन. अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा