तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश - मराठी कविता

तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश, मराठी कविता - [Tujhya Whatsappche Sandesh, Marathi Kavita] तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश, टप् टप् टपकत होते, प्राजक्तांच्या फुलांसारखे.
तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश - मराठी कविता | Tujhya Whatsappche Sandesh - Marathi Kavita
तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश
टप् टप् टपकत होते
प्राजक्तांच्या फुलांसारखे
शब्दांच्या पावसांसारखे
अर्थांच्या राजसा सारखे
प्रेमाची फुले देऊन
स्वनांचे झुले दिल्यासारखे
तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश
मॅसेजेस काहीबाही सांगत होते
विचार संदेश चांगुलपणाचे उपदेश
खूप महान आहे,आपला देश
थोरा मोठयांचे तत्वज्ञान अन्
आकाश निळेच का?
त्याचेही ज्ञान
निर्मनुष्य लेण्यांतील शांतता
मनाला माझ्या प्रश्न विचारीत होती
निरागस लहान मुलांसारखे
तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश
त्यात सकाळ संध्याकाळची छायाचित्रे
मन प्रसन्न करणारी विलोभनीय
तुझे रोखलेले डोळे अन् भुवया
कमनीय
तुझ्या खट्याळ संकेत संदेशांनी
सवेदनांना जागवलं वागवलं
बोलतं केलं
तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश
कुणाच्या वाट्याला न येवो अशा दु:खाने
ओल्या पापणकडांना हलतं केलं
संदेश मेसेजेस येत होते
दुभंगलेल्या गंगा जमनेला
जोडणाऱ्या पुलांसारखे
तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश
तुझ्या संदेशांनी कित्येकवेळा
आतून फाटलो मनात दाटलो
शब्दांच्या पाहऱ्यांतुन अलगद सटकलो
कधी कधी नखशिखांत मोहरलो
जाणिवांच्या संवेदनांनी शिवला गेलो
शांत तळ्यात मारल्या
खड्यांच्या बोलांसारखे
तुझ्या व्हॉट्सॲपचे संदेश
टप् टप् टपकत होते
प्राजक्तांच्या फुलांसारखे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.