भुंगा आणि चिमणी - इसापनीती कथा

भुंगा आणि चिमणी, इसापनीती कथा - [Bhau Aani Bahin, Isapniti Katha] सर्व मनासारखे होत नाही; तर जे अर्धेमुर्धे होईल त्यातच संतोष मानावा.
भुंगा आणि चिमणी - इसापनीती कथा | Bhau Aani Bahin - Isapniti Katha
एकदा एक भुंगा गुंजारव करीत इकडून तिकडे फिरत होता.

त्याला एक चिमणी म्हणाली, ‘मूर्खा, तू जो एकसारखा आपला एकच एक आवाज काढीत बसतोस तो काय म्हणून? वसंत ऋतूत पंचम गाणारी कोकिळ अथवा हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून लकेऱ्या मारणारा बुलबुल यांची बरोबरी तुझ्याने कधी तरी करवेल काय? तसे होत नसेल तर आपला भिकार सूर एकसारखा काढून लोकांना कंटाळा का आणावा?’ भुंगा म्हणाला, ‘चिमुताई, परमेश्वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे.’

वैचित्र्य असणे हाच जगाचा नियम आहे. दुसऱ्याचा हेवा न करता त्याने आप आपल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय आहे. जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते व बुलबुल मुका होतो अशा ऋतूत एखादया सुंदर बागेची निर्जनता भासू न देण्यात मज गरिबाचा उपयोग होतो.’

तात्पर्य: सर्व मनासारखे होत नाही; तर जे अर्धेमुर्धे होईल त्यातच संतोष मानावा.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

२ टिप्पण्या

  1. साहित्य वैविध्य आणि माहिती वैविध्य मूळे " मराठी माती " लोकप्रिय होत आहे किंवा " मराठी माती . कॉम"झालेला आहे.खूप खूप शुभेच्छा... कवी विवेक द.जोशी,औरंगाबाद
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.