Loading ...

आम्ही अभियंता - मराठी कविता

आम्ही अभियंता, मराठी कविता - [Aamhi Abhiyanta, Marathi Kavita] पृथ्वीवरील अवनतीच्या चिंतेमुळे, भगवंत उठले दचकुन, आज्ञा झाली म्हणे, घ्या नारदाला बोलावुन.

आम्ही अभियंता - मराठी कविता | Aamhi Abhiyanta - Marathi Kavita
पृथ्वीवरील अवनतीच्या चिंतेमुळे, भगवंत उठले दचकुन
आज्ञा झाली म्हणे, घ्या नारदाला बोलावुन

प्रगटले नारद म्हणे, प्रभो आपण जगाचे नियंता
शोधले आपल्या चिंतेचे समाधान, नाव त्याचे अभियंता

गाव नाही कुटुंब नाही, नाही निसर्गाची साथ
एकच ध्यास आम्हा, सर्वांचा सर्वांगीन विकास

गावापासुन दुर आम्ही, सोडुन समाजाची साथ
निसर्गाची पर्वा नाही, साध्य कराया देशाचा विकास

धरणे, विधुत रस्ते आमचीच निर्मिती
समाधान मिळे आम्हा, पाहुण सर्वांची उन्नती

कराया भोतीचा पालट, राबविले सिंचनाचे जाळे
ग्रामीणांची उन्नती पाहुन, समाधान मनी मिळे

हवेपेक्षा तिव्र गती, विमानाद्वारे प्रवास आकाशाचा
जमीणीवर केली प्रगती, आता वेध अंतराळाचा

आवाजाची गती, कधी मनी न स्वप्नी
आमचीच निर्मीती जेव्हा, कानाला लवतो दुरध्वनी

जल, थल, आकाश असाह्य काही न त्याला
तिन्ही लोकी कार्य त्याचे, करून समर्पीत सेवा देशाला

उन्नती खेड्याची, विकास उद्योगाचा, झगमगाट शहराचा
नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरून, साधला विकास देशाचा

साधण्या सर्वांचे कल्याण, सोसुनी कष्ट अपार
यशाचे येथे श्रेय कमी, अपयशाचीच चर्चा फार

पहावया पृथ्वीचा विकास, प्रगटले एकदिन भगवान
स्वतःच्या निर्मीतीवर खुष होऊन, क्षणात पावले अंतर्धान

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची