अति करण्यापासून नेहमी स्वतःला दूर ठेवले पाहिजे कारण अति केल्याचे परिणाम नेहमीच हानिकारक असतात
एके वेळी एक राजहंस एक बगळ्याला म्हणाला, ‘काय रे, किती तू अधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी गट्ट करण्यास तू मागेपुढे पाहता नाहीस. बरे - वाईट, नासके - चांगले हा भेदसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही. माझे म्हणशील तर मी फक्त पुर्ण विकास पावलेल्या कमलातले तंतूमात्र खाईन. दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.’बगळा म्हणाला, ‘दादा, माझ्या दृष्टीने असला चोखंदळपणा असणे बरे नव्हे. ज्या वेळी जे मिळेल ते खाऊन ढेकर दयावी व सुखी रहावे, हाच सुखाचा सोपा उपाय आहे. खाण्याचा पदार्थ समोर दिसला की अधिक मिजास न करता तो एकदम घशाखाली ढकलावा. हेच माझ्या दृष्टीने खरे शहाणपणाचे काम आहे.’ असे म्हणून बगळा उडाला तो जवळच्या तळ्याच्या काठी जाऊन बसला.
तेथे कडेलाच एक मासा त्यास दिसला तेव्हा अधिक विचार न करता त्याने एकदम तो गिळला, परंतु आत असलेला गळ त्याच्या घशास लागून तो जिवास मुकला.
राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसऱ्या एका कमळ असलेल्या तळ्यात गेला. परंतु तेथे कोणी हंस धरण्याकरिता जाळे लावले होते, त्यात तो सापडला.
तात्पर्य: अति सर्वत्र वर्जयेत्.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा