बाहेरचा भपका म्हणजे सौंदर्य नव्हे
एके समयी चित्त्यास असे वाटले की...‘आपल्या कातडीवरील विचित्र आणि सुंदर ठिपके पाहिले असता, आपले सौंदर्य सिंहापेक्षाही अधिक आहे; मग इतर जनावरांची काय कथा ?’ मग तो चित्ता सगळ्या पशूंचा तिरस्कार करू लागला.
तेव्हा एक कोल्हा त्याला म्हणाला, ‘बाबा, ही तुझी मोठी चूक आहे की, अंगातील सद्गुणांच्या भूषणावाचून बाहेरच्या भपक्यास शहाणे लोक भूषण म्हणत नाहीत.’
तात्पर्य: जो सुंदर आहे, त्याने जर आपल्या सौंदर्याचा गर्व केला नाही, तर ते सौंदर्य त्यास अधिक शोभा देईल.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा