Loading ...

सन्मान पडद्यामागील अस्सल कलाकारांचा

सन्मान पडद्यामागील अस्सल कलाकारांचा, मराठी टिव्ही - [Sanman Padyamagil Assal Kalakanacha, Marathi TV] दादा गोडकर म्हणजे उत्साहाचा अखंड झरा, अश्या शब्दात गिरीश ओक यांनी दादांप्रती असणारी आपली भावना व्यक्त केली.

सन्मान पडद्यामागील अस्सल कलाकारांचा - टीव्ही | Sanman Padyamagil Assal Kalakanacha - TV

छोटी मालकीण या मराठी मालिकेचे निर्मिती प्रमुख श्री. दादा गोडकर यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’च्या सेटवर नुकतंच एक दमदार सेलिब्रेशन करण्यात आलं. निमित्त होतं ते या मालिकेचे निर्मिती प्रमुख दादा गोडकर यांच्या वाढदिवसाचं. खरतर मालिकेमुळे कलाकार घरोघरी पोहोचत असतात. पण या कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पडद्यामागच्या मंडळींचीही तेवढीच मेहनत असते. याच मेहनतीची दखल घेत ‘छोटी मालकीण’च्या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन दादा गोडकर यांचा ६९वा वाढदिवस साजरा केला.

दादा गोडकर गेली अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. या वयातही त्यांचा उत्साह दांडगा आहे. अनेक मराठी नाटकं आणि मराठी टेलिव्हिजनच्या अगदी सुरुवातीचा काळ त्यांनी जवळून पाहिलाय. त्यामुळे अनुभवाची भलीमोठी शिदोरी दादा यांच्या गाठीशी आहे. ‘छोटी मालकीण’च्या सेटवरील कुटुंबाने केलेलं वाढदिवसाचं हे आगळंवेगळं सेलिब्रेशन पाहून दादा भारावून गेले होते.

‘दादा गोडकर म्हणजे उत्साहाचा अखंड झरा’ अश्या शब्दात गिरीश ओक यांनी दादांप्रती असणारी आपली भावना व्यक्त केली.

दादांकडून खुप काही शिकण्यासारखं आहे. कामाप्रती असणारी त्यांची चिकाटी आम्हा कलाकारांना नेहमीच नवी प्रेरणा देत असते. त्यांना दीर्घायुष्य लाभो. अश्या शब्दात गिरीश ओक यांनी दादा यांना शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची