Loading ...

दोघे वाटसरू आणि अस्वल

दोघे वाटसरू आणि अस्वल, इसापनीती कथा - [Doghe Vatsaru Aani Aswal, Isapniti Katha] सर्व काही ठीक चालले आहे, अशा वेळी पुष्कळ लोक ममता दाखवितात आणि भरंवशाची भाषणे करतात, परंतु संकट प्राप्त झाले म्हणजे जो तो स्वतःचा बचाव करतो. दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा विरळच.

दोघे वाटसरू आणि अस्वल - इसापनीती कथा | Doghe Vatsaru Aani Aswal - Isapniti Katha
दोन गृहस्थ जाण्यास निघाले, तेव्हा त्यांनी आपसात असा ठराव केला की, प्रवासात जर एखादयावर काही संकट आले, तर दुसऱ्याने त्यास मदत करावी.

पुढे ते एका अरण्यातून जात असता, एक अस्वल त्यांच्या अंगावर धावून आला. त्यावेळी त्यापैकी एकजण चपळ होता, तो झटकन एका झाडावर चढून बसला. जड अंगाचा होता, त्याच्याने पळवेना, तेव्हा तो आपला श्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन भुईवर पडला.

अस्वलाने त्याजजवळ येऊन त्याच्या कानाशी हुंगून पाहिले आणि हे प्रेत आहे असे समजून, त्यास काही उपद्रव न करता, तो निघून गेला. अस्वल गेल्यावर झाडावरील गृहस्थ खाली उतरून आपल्या सोबत्यात हसत विचारतो,‘मित्रा, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले?’ त्याच्या सोबत्याने उत्तर केले, ‘अस्वलाने मला सांगितले की, तुझ्यासारख्या लुच्चाच्या शब्दावर पुन्हा विश्वास ठेवू नकोस.’

तात्पर्य: सर्व काही ठीक चालले आहे, अशा वेळी पुष्कळ लोक ममता दाखवितात आणि भरंवशाची भाषणे करतात, परंतु संकट प्राप्त झाले म्हणजे जो तो स्वतःचा बचाव करतो. दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारा विरळच.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची