Loading ...
/* Dont copy */

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने - घरचा वैद्य (आरोग्य)

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने - घरचा वैद्य (आरोग्य) - स्वयंपाकघरात आढळणारी मात्र प्रभावी औषधांची माहिती [Beauty Tips From Kitchen - Home Remedies].

स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने - घरचा वैद्य (आरोग्य)

छोट्या - छोट्या सौदर्य समस्यांवर आपल्या स्वयंपाकघरातील स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने


स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने - घरचा वैद्य (आरोग्य)

(Beauty Tips From Kitchen - Home Remedies).



चेहऱ्यावर काळे डाग


ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.

पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे


पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.

निस्तेज चेहरा


चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते.

कोरफडचे उपयोग


पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.

गव्हाच्या कोंड्याचे उपयोग


  • गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते.
  • तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहऱ्यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो.
  • तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे.
  • एक चमचा मध, एक चमचा काकडीचा रस, एक चमचा संत्र्याचा रस हे सर्व मिक्स करुन चेहऱ्याला लावणे. १५-२० मिनिट लावणे. याचा क्रिम म्हणून उपयोग होतो.
  • जायफळ पाण्यात उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे.
  • टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग व वर्तुळे कमी होतात.
  • पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहऱ्यावर देणे.
  • टोमॅटोच्या आतील गर स्मॅश करुन चेहऱ्यावर लावणे. चेहऱ्यावर चमक येते व चेहरा निखरतो.
  • चेहऱ्यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहऱ्यावर लावणे.
  • चेहऱ्यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा, १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.
  • सर्दी खोकला असेल तर नेपाली अमृता काढा दिवसातून दोनदा ३ दिवस घेणे.
  • उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहऱ्याला लावून बाहेर पडणे.
  • केस गळत असेल तर जास्वंद जेलने केसांची मसाज करणे.
  • कोरफड जेलने केसांची मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना चमक येतो.
  • चेहऱ्याव्रील व अंगावरील लव कमी होण्यासाठी पपिता पावडर, नीम पावडर, मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकणे व त्याच्या चार पट मसूर डाळीचे पीठ टाकणे. कच्चा दुधात पेस्ट करून केसांच्या उलट्या दिशेने लावावे. पीठी ज्याप्रमाणे काढतो त्याप्रमाणे चोळावे नंतर साय / लोणी लावणे. कोल्ड क्रीम लावणे.
  • म्हसूर डाळ अर्धा किलो, आंबे हळद तोळा, गुलाब पावडर ५० ग्रॅम, संत्र्याची साल ५० ग्रॅम, चंदन पावडर ५० ग्रॅम, कडूलिंबाच्या पानाची पावडर, वाळा ५० ग्रॅम, मुलतानी माती ५० ग्रॅम, पपई पावडर ५० ग्रॅम हे सर्व मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. पाहिजे तेवढे उटणे घेऊन कच्चा दुधात पेस्ट करणे व ती सर्व अंगास लावुन आंघोळ करणे. ज्यांची कोरडी त्वचा असेल, हिवाळ्यात अंगाची फार खाज सुटत असेल तर त्यांनी हे मिश्रण लावुन आंघोळ करावी. फार चांगले असते.
  • चेहरा स्वच्छ व चमकदार होण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण, १० मिनिट पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लेप देणे.
  • चेहऱ्यावर सुरुकुत्या असेल तर त्यावर केशर व बदामची कच्च्या दुधात पेस्ट करुन लावणे.

चेहऱ्यावरील पिंपल्स


चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर मेरी गोल्ड जेल याने मसाज करावा.

चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर चेहऱ्यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.

जांभळीची बी पिंपल्सवर लावणे.

केस गळत असेल तर


केस गळत असेल तर एक मध्यम आकाराचे डाळींब सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करणे. जास्वंद फुल, १०-२० ब्राम्हीपाने, १ चमचा आवळा पावडर, मेहंदी पाने अंदाजे हे सर्व बारीक करून २०० ग्रॅम तिळाच्या तेलात लोखंडीच्या कढईत मंद गॅसवर तडतड येईपर्यंत गरम करून कोमट असतानांच एका बाटलीत भरुन ठेवावे व ते केसांना लावावे.

डोक्यात उवा झाल्यास सीताफळ बीची पावडर तेलात मिक्स करुन केसांच्या मुळांना लावणे. तेल लावताना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे.
आवळा, हिरडा, बेरडा समप्रमाणात घेऊन याची पावडर करणे, यालाच ‘त्रिफळा चूर्ण’ म्हणतात.

हार्ट ऍटॅकचा त्रास


रोज मुठ मुठ फुटाणे खाण्याने हार्ट ऍटॅकचा त्रास होत नाही.

पोटाचे विकार


रोजच्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर करावा म्हणजे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. सीतोपलादी चूर्ण व मध याची पेस्ट करुन चाटण घ्यावे व कोबींच्या पाण्याची वाफ घ्यावी.

त्रिफळा चूर्ण (दर महिन्यात २ चमचे वाढवत जाणे) रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावे. जंत कृमी असेल तर ३ चमचे त्रिफळा चूर्ण, एक चमचा वावडींग पावडर मिक्स करुन ३ दिवस रात्री झोपतांना कोमट पाण्याबरोबर घेणे.



स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने - घरचा वैद्य (आरोग्य) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची