Loading ...

जेवणातील हानिकारक संयोग (आरोग्य)

जेवणातील हानिकारक संयोग (आरोग्य) - जेवणात कोणते पदार्थ कोणत्या पदार्थासोबत खाल्याने जेवण हानिकारक होते याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.

जेवणातील हानिकारक संयोग (आरोग्य)
जेवणातील हानिकारक संयोग (आरोग्य), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
जेवणातील हानिकारक संयोग (आरोग्य) - जेवणात कोणते पदार्थ कोणत्या पदार्थासोबत हानिकाकरक आहेत त्याचा काळजीपुर्वक अभ्यास करुनच कोणते पौष्टिक अन्न ग्रहण केल्यास शरीराला त्याचा योग्य तो फायदा होतो, ते जाणून घेऊयात.

दुधाबरोबर

दही, मीठ, आंबट, चिंच, नारळ, मुळा किंवा त्याची पाने, तोरु, आंबट फळे, अपायकारक आहेत. दूधात मूळा टाकून घेऊ नये. याने दूध नासते. फणस व तेलाचे पदार्थ हे ही त्रासदायक आहेत.

दही

दूध, खीर, पनीर, गरम जेवण केली किंवा केळ्याची भाजी, खरबूज किंवा मूळा घेऊ नये.

तूपाबरोबर

गार दूध, गार पाणी आणि मध घेऊ नये.

फणस

पान आणि फणस एकत्र अपायकारक आहे.

मूळा

मूळा आणि गूळ एकत्र वापरू नये.

गरम पाण्याबरोबर मध अपायकारक आहे.

गार पाण्याबरोबर

शेंगदाणे, तूप , तेल, पेरु, काकडी, गरम दूध किंवा गरम जेवण घेऊ नये.

चहाबरोबर

काकडी, थंड फळे, गार पाणी घेऊ नये.

मासे

दूध, ऊसाचा रस, मध आणि पाण्या जवळ राहणाऱ्या पक्षांचे मांस या बरोबर खाऊ नये.

मांस

मध किंवा पनीर याच्याबरोबर घेतल्याने पोट खराब होते.

गरम जेवणाबरोबर

गार पाणी, किंवा कोणतीही खाण्यापिण्याची गार वस्तु गरम जेवणाबरोबर घेऊ नये.

तांबे/पितळी

पितळ्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ जसे तूप, तेल, आंबट दही, ताक, दूध, लोणी, भाज्या वगैरे विषाक्त होतात. म्हणून असे पदार्थ खाऊ नये.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची