बोगदा मराठी चित्रपटाचा टीझर

बोगदा या आशययुक्त मराठी चित्रपटाचा टीझर, मराठी चित्रपट [Bogda Marathi Cinema Teaser, Marathi Movie] मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे.
बोगदा या आशययुक्त मराठी चित्रपटाचा टीझर - मराठी चित्रपट | Bogda Marathi Cinema Teaser - Marathi Movie

मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांची मध्यवर्ती भूमिका असलेला बोगदा

मराठी चित्रपटसृष्टीत बौद्धिक आणि सकस आशयाच्या चित्रपटांची नांदी पाहायला मिळते.

त्यास जर सर्जन दिग्दर्शकाचा हातभार लाभला तर, हे सिनेमे प्रसिद्धीचे उच्चांक गाठतात. ‘नितीन केणी’ प्रस्तुत आणि ‘निशिता केणी’ लिखित व दिग्दर्शित ‘बोगदा’ हा सिनेमा देखील याच धाटणीचा आहे.

येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल माध्यमावर टीझर प्रकाशित करण्यात आला आहे.
बोगदा या आशययुक्त मराठी चित्रपटाचा टीझर - मराठी चित्रपट | Bogda Marathi Cinema Teaser - Marathi Movie
बोगदा या मराठी चित्रपटाच्या टीझर मधिल एक दृष्य

‘मृण्मयी देशपांडे’ आणि ज्येष्ठ अभिनेत्री ‘सुहासिनी जोशी’ यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा आशय आई आणि मुलीच्या नातेसंबधावर आधारित आहे. माय - लेकीचे ऋणानुबंध मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीझरमधे त्यांचे हे नाते आपणास दिसून येते; शिवाय कमी शब्दात खूप काही सांगून जाणारा हा टीझर पाहणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो.

बोगदा या आशययुक्त मराठी चित्रपटाचा टीझर - मराठी चित्रपट | Bogda Marathi Cinema Teaser - Marathi Movie
बोगदा या मराठी चित्रपटाच्या टीझर मधिल एक दृष्य

‘बोगदा’ हे शीर्षक देखील विचार करण्यासारखे असून, या सिनेमातील पात्रांचे संवादही प्रेक्षकांना बरेच काही सांगून जातील असे आहे. आई आणि मुलीच्या नात्याचा वेध घेणाऱ्या या स्त्रीप्रधान सिनेमाचे संवाद आणि पटकथा लेखन दिग्दर्शिका ‘निशिता केणी’ यांनीच केले असून, ‘करण कोंडे’, ‘सुरेश पानमंद’, ‘नंदा पानमंद’ यांच्यासोबत त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील संभाळली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.