दुःख टाळता येत नसले तरी त्याची तिव्रता मात्र नक्कीच कमी केली जाऊ शकते
प्राचीन काळी एकदा, एक गावातल्या सगळ्या बोकडांनी सभा भरवून खाटकांच्या हाती न सापडण्याची तजवीज कशी करावी, यासंबंधीने विचार चालविला.आपल्या मालकाचा डोळा चुकवून सर्वांनी पळून जावे, ही युक्ती सर्वानुमते पसंत ठरली व त्याच दिवशी अमलात आणावी असे ठरले.
ते ऐकून त्यातला एक म्हातारा शहाणा बोकड त्यास म्हणतो, ‘अरे, तुम्ही हे लक्षात ठेवा की, आपण जरी पळून गेलो,तरी बोकडाच्या मांसाशिवाय लोक राहतील, ही गोष्ट शक्य नाही.’
‘शिवाय खाटीक लोक आपल्या कामात चांगले वाकबगार असल्यामुळे आमचा जीव घेताना ते आम्हांस फार वेळ धडपडत ठेवीत नाहीत, परंतु आपण एकदा येथून निघून रानावनातून हिंडू लागलो म्हणजे भलत्याच अडाणी लोकांच्या हाती सापडू आणि ते आमचे हालहाल करून आम्हांस मारतील.’
हे ऐकताच बोकडांनी आपला ठराव रद्द केला आणि ते आपापल्या घरी चालते झाले.
तात्पर्य: कोठेही जाऊन दुःख टाळता येणे शक्य नसेल तर निदान जेथे कमी दुःख होईल ती जागा पत्करावी, हा शहाणपणा होय.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा