हरवल्या त्या गं, शेणा मातीच्या भीती
हरवल्या त्या, गाव गावातल्या रिती
हरवला तो गं वाटायचा पाटा
हरवल्या त्या, राना वणांमधल्या धावणाऱ्या वाटा
हरवलं ते गं, फुललेलं शेत
हरवली ती उडणारी, धूळ आणि रेत
हरवल्या त्या मातीच्या गं चुली
हरवली सारी नाती ओली ओली
हरवला तो गं, चुलीतला धूर
हरवलं ते गं, माझ्या गोठ्यातली गुरं
कुठं हरवली, माझ्या अंगणातली गोंड्याची ती फुलं
कुठं हरवली, दंगा करणारी गावातली मुलं
हरवला तो माझा भरलेला गाव
हरवला तो, नात्या नात्यातला भाव
कसं सारं हरवलं
माझं गाव हरवलं
हरवल्या त्या, गाव गावातल्या रिती
हरवला तो गं वाटायचा पाटा
हरवल्या त्या, राना वणांमधल्या धावणाऱ्या वाटा
हरवलं ते गं, फुललेलं शेत
हरवली ती उडणारी, धूळ आणि रेत
हरवल्या त्या मातीच्या गं चुली
हरवली सारी नाती ओली ओली
हरवला तो गं, चुलीतला धूर
हरवलं ते गं, माझ्या गोठ्यातली गुरं
कुठं हरवली, माझ्या अंगणातली गोंड्याची ती फुलं
कुठं हरवली, दंगा करणारी गावातली मुलं
हरवला तो माझा भरलेला गाव
हरवला तो, नात्या नात्यातला भाव
कसं सारं हरवलं
माझं गाव हरवलं