त्या डोंगराच्या आड माझे गाव - मराठी कविता

त्या डोंगराच्या आड माझे गाव, मराठी कविता - [Tya Dongarachya Aad Majhe Gaav, Marathi Kavita] त्या डोंगराच्या आड, माझे कोकण हे गाव.
त्या डोंगराच्या आड माझे गाव - मराठी कविता | Tya Dongarachya Aad Majhe Gaav - Marathi Kavita
त्या डोंगराच्या आड
माझे कोकण हे गाव

वाटे दिस गं सारावे
त्याला भेटायला जावे

त्याच्या वाटेत दगडी
मन त्यांच्याशी झगडी

तिथं एक शेत
जसा शेतकऱ्याचा तो लेक

तिथं मायेची गं मानसं
ती दोन डोळ्यांनी, पाहती गं वाट

मायेनी गं सारं घर भरावं
लेकरांनी सारं अंगण फुलावं

परत फिरता घरी
उभे राही डोळ्यात गं पाणी

दारी झाडा झुडपांची छाया
मिळे आजी-बाबांची ती गं माया

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.