माझी बैल जोडी साधी - मराठी कविता

माझी बैल जोडी साधी, मराठी कविता - [Majhi Bail Jodhi Sadhi, Marathi Kavita] झुंजूमुंजू होता उठे, मालकाच्या आधी, काय सांगू गड्या, माझी बैल जोडी साधी.
माझी बैल जोडी साधी - मराठी कविता | Majhi Bail Jodi Sadhi - Marathi Kavita
झुंजूमुंजू होता उठे
मालकाच्या आधी
काय सांगू गड्या
माझी बैल जोडी साधी

शेतामध्ये जाण्यासाठी
हाती घेता काठी
मी पुढे जाता
माझ्या येती पाठी पाठी

येड्या ओठावरी जेव्हा
जुनी गाणी येती
घुंगराच्या तालावरी
साथ मला देती

सोनं केलं त्यांनी जिथं
आधी होती माती
डोळ्यामध्ये पाणी येतं
बघुनिया फुललेली शेती

हीच असते त्या
मुक्या जनावराची रीत
तुला मला येणार नाही
एवढी करतात प्रित

संपते दिनचर्या जेव्हा
परत फिरतो गवारी
भरूनिया गोठ्यात
जेव्हा लावतो कवडी

1 टिप्पणी

  1. विठ्ठल वाघ यांची बैला वर ची कविता माझी आवडती.
    दिलीप नानोटी. Nagpur.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.