सिंहगड किल्ल्याचे फोटो

सिंहगड किल्ला फोटो - [Photos of Sinhagad Fort].
सिंहगड किल्ल्याचे फोटो | Sinhagad Fort Photos

सिंहगड किल्लाचे मुळ नाव कोंढाणा, तानाजी मालुसरेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवण्यात आले


सिंहगडाचे मुळ नाव ‘कोंढाणा’. ‘इसामी’ नावाच्या १४व्या शतकातील भारतीय इतिहासकार आणि राज कवीने ‘फुत् अस् सलातीन’ (Futuh-us-Salatin) किंवा ‘शाहनामा ए हिंद’ (Shahnama-e-Hind) या फारसी भाषेतील काव्यात (१३५०) मुहम्मद तुघलकाने १६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता.

अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख १४८२, १५५३, १५५४ आणि १५६९ च्या सुमारासचे आहेत. १६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर ‘सिदी अवर’ किल्लेदार असतांना मोगल व आदिलशाह यांनी मिळून ‘कोंढाणा किल्ला’ घेतला. यावेळेस (१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार ‘मुधाजी मायदे’ याने लुटला.

‘दादोजी कोंडदेव’ आदिलशाहचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (१६४७) ‘कोंढाणा किल्ला’ घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.

इतिहासकार ‘श्री. ग. ह. खरे’ यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वी कोंढाण्याचे नाव ‘सिंहगड’ झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. ‘कै. ह. ना. आपटे’ यांच्या कादंबरीतील उल्लेखामुळे लोकांची समजूत झाली की तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव ‘सिंहगड’ झाले.

शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांच्या तर कधी मोगलांच्या ताब्यात होता.


संदर्भ: श्री. ग. ह. खरे लिखित ‘सिंहगड’ पुरातत्व वस्तुसंग्रहालय (महाराष्ट्र शासन यांचे प्रकाशन, १९८४)

सिंहगड किल्ल्याचे फोटो


स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

२ टिप्पण्या

  1. नमस्कार स्वातीजी,
    उदेभान राठोड यांच्या संबंधी माहिती हवी आहे. तो गडकरी केंव्हा झाला, तानाजींशी हातघाईचे समर झाले तेंव्हा गडावर किती त्यांचे सैनिक होते...
    तो मेल्यावर त्यांचे किती सैनिक मेले व जखमी अवस्थेत शरण आलेले... यावर प्रकाश टाकावा..
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.