Loading ...

सिंहगड किल्ल्याचे फोटो (फोटो गॅलरी)

सिंहगड किल्ल्याचे फोटो (फोटो गॅलरी) - तानाजी मालुसरेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले होते [Photos of Sinhagad Fort].

सिंहगड किल्ल्याचे फोटो (फोटो गॅलरी)

सिंहगड किल्लाचे मुळ नाव कोंढाणा, तानाजी मालुसरेंच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवण्यात आले


सिंहगड किल्ल्याचे फोटो (फोटो गॅलरी)

(Sinhagad Fort Photos) सिंहगडाचे मुळ नाव ‘कोंढाणा’. ‘इसामी’ नावाच्या १४व्या शतकातील भारतीय इतिहासकार आणि राज कवीने ‘फुत् अस् सलातीन’ (Futuh-us-Salatin) किंवा ‘शाहनामा ए हिंद’ (Shahnama-e-Hind) या फारसी भाषेतील काव्यात (१३५०) मुहम्मद तुघलकाने १६२८ मध्ये कुंधीयाना किल्ला घेतल्याची माहिती येते. त्यावेळेस हा किल्ला नागनायक नावाच्या कोळ्याच्या ताब्यात होता.



अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंढाण्याचे उल्लेख १४८२, १५५३, १५५४ आणि १५६९ च्या सुमारासचे आहेत. १६३५ च्या सुमारास कोंढाण्यावर ‘सिदी अवर’ किल्लेदार असतांना मोगल व आदिलशाह यांनी मिळून ‘कोंढाणा किल्ला’ घेतला. यावेळेस (१६३६) आदिलशाहचा खजिना डोणज्याच्या खिंडीत निजामाचा सरदार ‘मुधाजी मायदे’ याने लुटला.

‘दादोजी कोंडदेव’ आदिलशाहचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत (१६४७) ‘कोंढाणा किल्ला’ घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला.

इतिहासकार ‘श्री. ग. ह. खरे’ यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वी कोंढाण्याचे नाव ‘सिंहगड’ झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. ‘कै. ह. ना. आपटे’ यांच्या कादंबरीतील उल्लेखामुळे लोकांची समजूत झाली की तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव ‘सिंहगड’ झाले.

शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांच्या तर कधी मोगलांच्या ताब्यात होता.


संदर्भ: श्री. ग. ह. खरे लिखित ‘सिंहगड’ पुरातत्व वस्तुसंग्रहालय (महाराष्ट्र शासन यांचे प्रकाशन, १९८४)
सिंहगड किल्ल्याचा पुणे दरवाजा
सिंहगड किल्ल्याचा पुणे दरवाजा
तान्हाजी मालुसरे यांचा पुतळा
तान्हाजी मालुसरे यांचा पुतळा
तानाजी मालुसरे यांची समाधी
तानाजी मालुसरे यांची समाधी
कोंढाणेश्वर मंदीर
कोंढाणेश्वर मंदीर
गडावरील दगडी बांधकाम
गडावरील दगडी बांधकाम
गडावरील पाण्याचे तळे
गडावरील पाण्याचे तळे
सिंहगडावरिल अमृतेश्वर मंदिर
सिंहगडावरिल अमृतेश्वर मंदिर
अमृतेश्वर मंदिर फलक
अमृतेश्वर मंदिर फलक
टिळक निवास
टिळक निवास
सिंहगडावरिल माहिती फलक
सिंहगडावरिल माहिती फलक
घोड्यांच्या पागा
घोड्यांच्या पागा
गडावरील जुने दगडी बांधकाम
गडावरील जुने दगडी बांधकाम


सिंहगड किल्ल्याचे फोटो (फोटो गॅलरी) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

  1. नमस्कार स्वातीजी,
    उदेभान राठोड यांच्या संबंधी माहिती हवी आहे. तो गडकरी केंव्हा झाला, तानाजींशी हातघाईचे समर झाले तेंव्हा गडावर किती त्यांचे सैनिक होते...
    तो मेल्यावर त्यांचे किती सैनिक मेले व जखमी अवस्थेत शरण आलेले... यावर प्रकाश टाकावा..

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची