Loading ...
/* Dont copy */

सरसगड किल्ला

सरसगड किल्ला - [Sarasgad Fort] १६०० फूट उंचीचा सरसगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पाली डोंगररांगेतील सरसगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

सरसगड किल्ला - Sarasgad Fort

पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड

सरसगड किल्ला - [Sarasgad Fort] १६०० फूट उंचीचा सरसगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पाली डोंगररांगेतील सरसगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. श्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाण. येथील गणपती ‘बल्लाळेश्वर’ म्हणून ओळखला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड.

पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे. या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसर टेहळणी करता येते. शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यादाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले. स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत या गडाची व्यवस्था ‘भोर’ संस्थानाकडे होती.

सरसगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


तसे पाहीलं तर हा गड दोन ते तीन तासात न्याहाळता येतो. दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायऱ्यावर चढाव्यात म्हनजे तटबंदी दिसते. दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्याचा हौद लागतो. पुढे एक भुयारी मार्ग लागतो. सध्या हा मार्ग मात्र अस्तित्वात नाही. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. याच्या जवळच ‘मोती हौद’ आहे. जर आपण उजवीकडे गेलो तर १५ पायऱ्या चढाव्या लागतात आणि मग बालेकिल्ल्याचा पायथा लागतो.

बालेकिल्ल्याचा पायथा: समोरच एक मोठा पाण्याचा हौद आहे. येथे बारामाही पाणी असते. हौदाच्या डाव्या बाजूस एक शहापीराचे थडगे आहे. त्याच्या जवळूनच पुन्हा पाण्याची तळी आहेत. जवळच कपारीत शंकराची एक पिंड आहे. या कपारीत आपणास रहाता येते. हौदाच्या उजव्या बाजूला काही धान्यकोठारे, शस्त्रागरे आहेत. तसेच निवासस्थाने, आखाडा व कैदखाना देखील आहे. येथे दहा -बारा जणांची रहाण्याची सोय होते. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग लागतो.

बालेकिल्ल्याचा माथा: बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही नाही. गडावर केदारेश्वराचे मंदिर आहे. येथे एक तलाव आहे. टेहळणीसाठी दोन बुरूज आहेत. मात्र या बालेकिल्ल्यावरून समोरच असणारा तीन कावडीचा डोंगर दिसतो. समोरच उभा असणारा सुधागड, तैलबैला, धनगड आणि कोरीगड दिसतो. तसेच पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, कोकण, जांभूळपाडा असा सर्व परिसर दिसतो. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीराचा उरूस भरतो. महाशिवरात्रीला केदारेश्वराला भाविकांची गर्दी असते.

सरसगड गडावर जाण्याच्या वाटा


गडावर जाण्यासाठी मात्र ‘दिंडी’ दरवाजाची एकच वाट वापरात आहे. पाली गावात उतरून या दरवाज्याने गडावर जाता येते. मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या डांबरी रस्त्यावरून डावीकडे डावीकडे वळावे आणि मळलेली वाट पकडावी. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. बुरुजाच्या पायथ्याशी एक खोली आहे. या खोलीचा उपयोग पहारेकऱ्यांना रहाण्यासाठी होत असे.

पुढे दरवाजापर्यंत जाण्यासाठी ९६ पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या जरा जपूनच चढाव्यात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका उद्भवतो. पायऱ्यांची वाट फार दमछाक करणारी आहे. या पायऱ्या आपल्याला सरळ दरवाजापर्यंत आणून सोडतात. दरवाजाच्या समोरच पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. गडावर जाण्यासाठी अजून एक वाट असून ती वापरातील नसल्याने या वाटेचा उपयोग कोणी करत नाही.

सरसगड किल्ल्याच्या शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गे पाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.




मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची