Loading ...

शिरगावचा किल्ला

शिरगावचा किल्ला - [Shirgaocha Fort] शिरगावचा किल्ला सागर किनाऱ्यावरील किल्ले प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील कोकण डोंगररांगेतील शिरगावचा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत सोपा समजला जातो.

शिरगावचा किल्ला - Shirgaocha Fort

शिरगावचा किल्ल्यापाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून किल्ला तसा दुर्लक्षित असल्याने समुद्रकिनाराही निर्मनुष्य असतो.

शिरगावचा किल्ला - [Shirgaocha Fort] शिरगावचा किल्ला सागर किनाऱ्यावरील किल्ले प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील कोकण डोंगररांगेतील शिरगावचा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने अत्यंत सोपा समजला जातो. शिरगावचा किल्ला पालघर तालुक्यात माहीमच्या उत्तरेला ५ कि.मी. अंतरावर आहे. शिरगावचा किल्ल्यापाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून किल्ला तसा दुर्लक्षित असल्याने समुद्रकिनाराही निर्मनुष्य असतो.

शिरगावचा किल्ल्याचा इतिहास


१७३९ साली मराठ्यांनी हा किल्ला डहाणू, केळवे, तारापूर या किल्ल्याबरोबर जिंकून घेतला. मराठ्यांच्या आधी या किल्ल्याचा ताबा पोर्तुगिजांकडे होता. नंतर १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेला.

शिरगावचा किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे


शिरगावचा किल्ला साधारण २०० फूट लांब व १५० फूट रुंद इतक्याच आकाराचा आहे. मात्र किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच व १० फूट रुंद आहे. किल्ल्याला चार कोपऱ्यात चार बुरुज असून प्रवेशद्वाराजवळही एक बुरूज आहे. प्रवेशद्वाराच्या वर एक अत्यंत सुबक बांधणीचा चबुतरा आहे. हा चबुतरा आपल्याला रायगडावरील महाराजांच्या समाधीची आठवण करून देतो. येथील तटबंदीवर, बुरुजांवर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणाऱ्या तटबंदीच्या बाहेरून पायऱ्या असल्या तरी बुरुजांवर जायला तटबंदीच्या अंतर्भागातूनही पायऱ्या केलेल्या आहेत.

अर्थात आतून जाणाऱ्या पायऱ्या सध्या वापरात नसल्या तरी बुरुजाला असलेल्या खिडक्यांमधून आपल्याला या पायऱ्या दिसतात. किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीत आणखी एक दरवाजा आहे. मात्र आता तो पूर्णपणे बंद केलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून पश्चिमेकडे असणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचे सुंदर दृश्य दिसते.

शिरगावचा गडावर जाण्याच्या वाटा


पश्चिम रेल्वेवरील शेवटचे स्टेशन म्हणजे विरार. विरारच्या पुढे जाण्यासाठी मेल अथवा शटल पकडावी व पालघरला उतरावे. पालघरला पोहोचल्यावर तेथून सातपाटी मार्गावर धावणाऱ्या बस अर्धा-अर्धा तासाने आहेत. या बस पकडून आपल्याला ‘मशीद स्टॉपवर’ उतरावे लागते. हे अंतर बसने १५ मिनिटाचे आहे. याशिवाय पालघरहून या स्टॉपवर यायला रिक्षासुद्धा आहेत. मशीद स्टॉपवरून १० मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्यापाशी येतो. किल्ल्याला लागूनच एक शाळा आहे.

संपूर्ण किल्ला अर्धा-पाऊण तासात बघून होतो. त्यामुळे राहण्याची गरज नाही. मात्र तशी गरज भासल्यास किल्ल्याला लागूनच असलेल्या शाळेमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय पालघरला अनेक चांगली हॉटेल्स आहेत त्यामध्ये होते. गडावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नाही.


मराठीमाती | MarathiMati
संपादक मंडळ, मराठीमाती डॉट कॉम
मराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची