सांग कुठून येतो रे वीर - मराठी कविता

सांग कुठून येतो रे वीर, मराठी कविता - [Sang Kuthun Yeto Re Veer, Marathi Kavita] सांग कुठून येतो रे वीर, एवढे धैर्य, एवढा धीर.
सांग कुठून येतो रे वीर - मराठी कविता | Sang Kuthun Yeto Re Veer - Marathi Kavita
सांग कुठून येतो रे वीर
एवढे धैर्य, एवढा धीर
सांग कुठून येतो रे वीर

तू झेलताना गोळी छातीवर
भारत माता, हात फिरवते का पाठीवर
सांग लढताना तुझे हरपते का भान
सांग उरी दाटुन येतो का अभिमान
तू लढताना तुला आठवत काय काय
फक्त भारत माता कि तुझी हि माय
लढताना कोण सांगत जा लढ आणि दुश्मनाला चीर

सांग कुठून येतो रे वीर
एवढे धैर्य, एवढा धीर

बंदूक घेताना हाती
तुला जरा हि वाटत नाही का भीती
तुझी ताठ मान अन तुझी चौडी छाती
रोज तुझेच तुला सांगते का, विजयाचा टिळा, लाव तुझ्या माथी
तिथे रणभूमीवर, जास्त लाल रंग कुणाचा
त्या लाल मातीचा कि, तुमच्या सांडलेल्या रक्ताचा
लढताना कधी आठवतात का ते आईचे शब्द, बाळा मागे फिर

सांग कुठून येतो रे वीर
एवढे धैर्य, एवढा धीर

आज तुला लिहिताना शब्द हि थरथरले
सांग तुला कुठल्या धुडीने, असते मंतरले
मला पाहायचं आहे तुला, भांन हरवून लढताना
दुश्मन कसा मागे फिरुन गेला हारताना
मला पाहायची आहे आग तुझ्या डोळ्यांची
ती लाल रंगाची होळी, बंदुकीतल्या गोळ्यांची
शांत झाल्यावर आवाज बंदुकीचे, भोवती असते का फक्त किर

सांग कुठून येतो रे वीर
एवढे धैर्य, एवढा धीर

1 टिप्पणी

  1. khup sundar, kharach ha prashan mala pan padato. Dharatirthi padtana kay wata asel tya veerana
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.