अनभ्यासी मुलगा

अनभ्यासी मुलगा, इसापनीती कथा -[Anabhyasi Mulga, Isapniti Katha] मौनं सर्वार्थसाधनम्‌.
अनभ्यासी मुलगा - इसापनीती कथा | Anabhyasi Mulga - Isapniti Katha
एक आळशी मुलगा शाळेस जात असे. त्यास मुळाक्षरापैकी पहिल्या अक्षराचाही उच्चार काही केल्या करता येईना.

शेवटी पंतोजी म्हणाला,‘अरे, तोंड उघडून ‘अ’ म्हण.’ त्या मुलाने तोंड पसरले, पण ‘अ’ म्हणण्याचा नुसता प्रयत्नही केला नाही! आपल्या प्रयत्नाचा काही उपयोग होणार नाही अशी पंतोजीची खात्री झाल्यावर, मुलांनी आपापसात त्यास समज देण्याचे ठरवले.

एकाने म्हटले,‘अ’ म्हणणे ही इतकी कठीण गोष्ट नाही, असे मला वाटते. आळशी म्हणाला,‘होय, खरेच ते कठीण नाही! पण मी एकदा ‘अ’ म्हणालो की, माझ्या मागे ‘आ’ म्हण म्हणून टुमणे लागणारच! म्हणून माझा निश्चय आहे की उच्चारच करावयाचा नाही.’

तात्पर्य: मौनं सर्वार्थसाधनम्‌.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.