Loading ...

आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल

आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल, इसापनीती कथा - [Ambyache Jhad Aani Bhoplicha vel, Isapniti Katha] लवकर प्रगती होणे हे नेहमी वाखाणण्याजोगे असते असे नाही.

आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल - इसापनीती कथा | Ambyache Jhad Aani Bhoplicha vel - Isapniti Katha
आंब्याचे झाड आणि भोपळीचा वेल (इसापनीती कथा), चित्र: वैशाली चिटगोपकर
लवकर प्रगती होणे हे नेहमी वाखाणण्याजोगे असते असे नाही.

एका आंब्याच्या झाडाच्या तळाजवळ एक भोपळीचा वेल लावला होता. वेल अगदी हंगामी लावला गेल्यामुळे झपाटयाने वाढला व आंब्याच्या झाडावर चढून त्याने बराच मोठा भाग व्यापला.

पुढे त्यास फुले व फळे येऊ लागली तेव्हा आंब्याचे झाड रिकामे पाहून तो आब्यांला म्हणाला, ‘काय रे दादा, मी जितक्या दिवसात वाढलो त्याहून अधिक वर्षे तुला वाढायला लागली,’ असे म्हणून तो तुच्छतादर्शक मुद्रेने आंब्याकडे पाहू लागला.

आंब्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे तू फार झपाटयाने वाढलास व मला वाढावयास अधिक काळ लागला हे खरे, परंतु कित्येक हिवाळे व पावसाळे मजवरून गेले तरी मी जशाचा तसाच आहे, परंतु थंडीने थोडीशी चमक दाखवली तर तुला मात्र आपला गर्व फळे आणि फुले यांसह सोडावा लागला.

तात्पर्य: लवकर प्रगती होणे हे नेहमी वाखाणण्याजोगे असते असे नाही.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची