Loading ...
/* Dont copy */

बोगदा मराठी चित्रपटाचा ट्रेलर

बोगदा मराठी चित्रपटाचा ट्रेलर, मराठी चित्रपट - [Bogda Marathi Cinema Trailer, Marathi Movie] इच्छा मरण या विषयावर भाष्य करणारा बोगदा.

बोगदा मराठी चित्रपटाचा ट्रेलर - मराठी चित्रपट | Bogda Marathi Cinema Trailer - Marathi Movie
बोगदा मराठी चित्रपटाचा ट्रेलर (ट्रेलर्स).
इच्छा मरण या अत्यंत संवेदनशील विषयावर भाष्य करणारा मराठी चित्रपट बोगदा.

‘बोगदा’ या सिनेमाच्या शीर्षकावरून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात, या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम लाभला आहे. नितीन केणी प्रस्तुत ‘बोगदा’ या सिनेमाचा ट्रेलर ‘इच्छा मरण’ या विषयावर भाष्य करतो. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेला हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा उत्तम नमुना असल्याची जाणीव, सिनेमाचा ट्रेलर पाहताना होतो.

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांनी साकारलेली आजारी आई आणि गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारलेली लेक या दोन प्रमुख पात्रांवर हा सबंध सिनेमा बेतला असल्याचे, या ट्रेलरमधून कळून येते. तसेच, अभिनेता रोहित कोकाटेचीदेखील यात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील भावनिक ऋणानुबंध जपणारा 'बोगदा' सिनेमाचा ट्रेलर पाहताना प्रेक्षक आपसूकच, सिनेमाच्या आशयात गुंतून जातो.

नितिन केनी
नितिन केनी.
निशिता केनी आणि मृन्मयी देशपांडे
निशिता केनी आणि मृन्मयी देशपांडे.

आईचे आजारपण आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा यांमध्ये गुरफटलेल्या एका गरीब सामान्य मुलीची कथा यात आहे. तसेच, आजाराला कंटाळून आपल्या मुलीकडे मरणाची केविलवाणी मागणी करणारी ‘आई’ देखील यात आपल्याला दिसून येते आहे. जन्म आणि मृत्यू या जीवनातील दोन अटळ घटकांवर या सिनेमाचा ट्रेलर भाष्य करतो. आईच्या इच्छेखातर तिला स्वेच्छामरण देण्याचा कठीण विचार एखादी मुलगी करू शकेल का? हा बाका प्रश्न ‘बोगदा’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे उपस्थित होतो.

मृन्मयी देशपांडे
मृन्मयी देशपांडे.

‘इच्छा मरण’ या मुद्द्यावर समाजात अनेक वैचारिक मतभेद असून, खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय असलेला हा मुद्दा ‘बोगदा’ सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. त्यामुळे, या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार आहे? ही उत्सुकता सिनेप्रेक्षकांना स्वाभाविक आहे.

रोहित कोकाटे, सिद्धार्थ महादेवन, मृन्मयी देशपांडे, निशिता केनी आणि सौमिल शृंगारपुरे
रोहित कोकाटे, सिद्धार्थ महादेवन, मृन्मयी देशपांडे, निशिता केनी आणि सौमिल शृंगारपुरे.
रोहित कोकाटे, नंदा परमार, मृन्मयी देशपांडे, सुरेश पनमंद आणि करण कोंडे
रोहित कोकाटे, नंदा परमार, मृन्मयी देशपांडे, सुरेश पनमंद आणि करण कोंडे.
सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरे
सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल शृंगारपुरे.

येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन निशिता केणी यांनी केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांसोबत त्यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना वैचारिक आणि भावनिक दृष्टीकोन प्रदान करत असल्यामुळे, ‘बोगदा’ सिनेमा प्रेक्षकांना नवी दिशा मिळवून देईल अशी आशा आहे.


बोगदा मराठी चित्रपटाचा ट्रेलर (व्हिडिओ)

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची