माझे हृदयस्पंदन - मराठी कविता

माझे हृदयस्पंदन, मराठी कविता - [Majhe Hrudayspandan, Marathi Kavita] हळहळते मन, क्षण क्षण व्याकूळ.
माझे हृदयस्पंदन - मराठी कविता | Majhe Hrudayspandan - Marathi Kavita
हळहळते मन
क्षण क्षण व्याकूळ
दिसामाजी येत राही
तुझीच आठवण

सांज येते दाटून
ओलावले नयन
पापणी पापणीत
तुझी सय भरुन

उष्ण निःश्वास तुझे
माझ्या श्वासांतून
ओठ अनामिक
बहरते गात्रांतून

कोठे कसे आवरू
माझे हृदयस्पंदन
त्याला केवळ आकळे
तुझ्यासाठीचे आक्रंदन

तुझ्या भेटीसाठी
अधीर झाले तन मन
पैलतीरावर बोलावते
तुझ्या बासरीची धून

२ टिप्पण्या

  1. Khup sunder...👌👌
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.