काही थेंब पावसाचे - मराठी कविता
काही थेंब पावसाचे, मराठी कविता - [Kahi Themb Pavasache, Marathi Kavita] काही थेंब पावसाचे, ओठी देऊ केले मजला.
काही थेंब पावसाचे
ओठी देऊ केले मजला
आठवांच्या तलखीला
तो शांत करुनी गेला
अमृत प्यायले मी
जणू स्मृतींचे तुझ्या
डोळ्यातील थेंबांनी
तो पूरता भिजवून गेला