मला सुद्धा जगायचंय - मराठी कविता

मला सुद्धा जगायचंय, मराठी कविता - [Mala Suddha Jagayachay, Marathi Kavita] पेटलेल्या दिव्यामधील, मिणमिणती वात म्हण.
मला सुद्धा जगायचंय - मराठी कविता | Mala Suddha Jagayachay - Marathi Kavita
पेटलेल्या दिव्यामधील
मिणमिणती वात म्हण

तुझ्या उमेदीला दिलेली
नशिबाने मात म्हण

पण तुझ्या वंशवेलीवर मला फुल बनुन उगायचंय
आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

तुच दिली आस मला
तुच दिला प्राण हा

तुच माझी माता व्हावी
मिळावा सन्मान हा

हक्क आहे तो माझा मला ही जग बघायचंय
आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

माझा गुन्हा, माझा दोष
मला काहीच कळत नाही

का करते तु माझ्यावर रोष
मला काहीच कळंत नाही

तु ही कधी मुलगी होती हे मी का तुला सांगायचंय
आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

नको समजुस मी तुला
जिंदगीभरचा भार होईल

दुर्गा होईल, शक्ती होईल
मी तुझा आधार होईल

समजावुन सांग तु तुझ्या मनाला असं नाही वागायचंय
आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.