नवं स्वप्न पाहू दे - मराठी कविता

नवं स्वप्न पाहू दे, मराठी कविता - [Nava Swapn Pahu De, Marathi Kavita] काळोखात माझ्या आज मला राहू दे, चुकलेल्या वाटेवर नवं स्वप्न पाहु दे.
नवं स्वप्न पाहू दे - मराठी कविता | Nava Swapn Pahu De - Marathi Kavita
काळोखात माझ्या आज मला राहू दे
चुकलेल्या वाटेवर नवं स्वप्न पाहु दे
हळव्या काट्यांचे रंग जरा लेऊ दे
हरवलेल्या वळणाकडे पुन्हा पुन्हा पाहू दे

आयुष्यात जिंकणं जरुरीचं नाही
कधीतरी मागे सोडावं काही
नेहमीच कशाला पुढे जायची घाई
आजतरी मला सर्वात मागे राहू दे

चढावा कुठवर घाट यशाचा
अपयशाचा तळ आजतरी पाहू दे
काळोखात माझ्या आज मला राहू दे
चुकलेल्या वाटेवर नवं स्वप्न पाहू दे

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.